पश्चिम महाराष्ट्र

सातारा जिल्ह्यात कोरोनाचे 41 रुग्ण; कऱ्हाडत पाच तर फलटणला एक पाॅझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड ः कोरोना हॉटस्पॉट बनलेल्या तालुक्यातील वनवासमाची आणि आगाशिवनगर येथील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आज (मंगळवारी) आणखी पाच रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे आज (मंगळवार) आलेल्या आरोग्य विभागाच्या तपासणी अहवालातुन समोर आले आहे. त्यामुळे तालुक्यात सुरु झालेली कोरोनाची साखळी थांबायलाच तयार नाही. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधित संख्या वाढून 30 झाली आहे. 

कऱ्हाड तालुका हा जिल्ह्यातील सर्वाधिक कोरोना बाधीत असलेला तालुका बनला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कऱ्हाडवर लक्ष केंद्रीत केले आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी सातत्याने येथे बैठका घेवुन यंत्रणा अलर्ट ठेवली आहे. तालुक्यात बाबरमाचीतील रुग्णापासुन सुरु झालेली साखळी थांबायलाच तयार नाही. बाबरमचीत जरी रुग्ण सापडले नसले तरी त्यामुळे बाधीत झालेल्या वनवासमाची आणि आगाशिवनगर येथील बाधीतांच्या संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. परिणामी ती दोन्ही गावे कऱ्हाड तालुक्यासाठी कोरोना हॉटस्पॉटच बनली आहेत. संबंधित दोन्ही ठिकाणीच कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तेथील साखळी तोडण्याचे आव्हान होवुन बसले आहे.

तेथील बाधीत वाढल्यामुळे कालपर्यंत (सोमवार) तालुक्याची असणारी 25 ही संख्या ओलांडुन आज आणखी त्यात वाढ झाली आहे. आज (मंगळवारी) त्यामध्ये आणखी पाच रुग्णांची वाढ झाली. त्यामध्ये वनवासमाची व आगाशिवनगर येथील रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे तालुक्यातील बाधीतांची संख्या सध्या 30 वर पोचली आहे. दिवसेंदिवस संख्या वाढत असल्याने तालुक्याच्या चिंतेतही आणखीच भर पडली आहे.

ब्रेकिंग : पुण्यातील प्रवासी फलटणमध्ये काेराेनाबाधित

कोरोनानंतर पश्‍चिम महाराष्ट्रापुढे हे असेल संभाव्य संकट

Lockdown2 : तब्बल 125 सापांना जीवदान देणारा अवलीया सर्पमित्र

वाचन आवडीस प्रोत्साहन देणारा असाही व्हॉटस्‌ ऍप ग्रुप

एका पत्रकाराची ‘कोरोना’ डायरी...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario : ४ जागांसाठी ७ संघांमध्ये शर्यत! प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची कोणाला किती संधी? जाणून घ्या डोकं चक्रावून टाकणारं समीकरण

IPL 2026 Playoff Race: विजयासह कोलकाता नाइट रायडर्सची गाडी पुढे सरकली; दिल्ली कॅपिटल्सचे पॅकअप, Finn Allen चे वादळी शतक

Pune tenant & PG rules : पुण्यात भाडेकरू, पेईंग गेस्ट, वापरलेल्या वाहनांच्या व्यवहारांची माहिती पोलिसांना देणे अनिवार्य

Onion Price Crash: सटाणा बाजारात कांद्याला ५० रु. दर; संतप्त शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या हस्तक्षेपाने अनर्थ टळला

SSC Result : मंगळवेढा दहावी निकालात ५.८४ टक्के घसरण; इंग्लिश स्कूलची स्वर्णश्री धनंजय पाटील ९९.८० टक्क्यांसह तालुक्यात अव्वल

SCROLL FOR NEXT