कोरोनानंतर पश्‍चिम महाराष्ट्रापुढे 'हे' असेल संभाव्य संकट

कोरोनानंतर पश्‍चिम महाराष्ट्रापुढे 'हे' असेल संभाव्य संकट
Updated on

कोयनानगर ः कोरोनाच्या संकटाबरोबर राज्यातील सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांवर पुढील दोन महिन्यांत पूरस्थितीचे संकट गडद झाले आहे. या संकटाला कोयना धरणात सध्या असणारा पाणीसाठा व हवामान खात्याने 100 टक्के पर्जन्यमान होणार असल्याचा अंदाज व्यक्त करून तिन्ही जिल्ह्यांना जणू इशाराच दिला आहे. पाऊस तोंडावर आला तरी धरणात 50 टीएमसी पाणीसाठा असून, पावसापूर्वी हा पाणीसाठा संपवा, अशी मागणी होत आहे. त्यामुळे कोरोनानंतर पश्‍चिम महाराष्ट्रातील जनतेचे "भय इथे संपत नसल्या'चे अधोरेखित झाले आहे. 

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्यावर्षी शतकातील उच्चांकी पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणाचे सहा वक्र दरवाजे अनेकवेळा उघडले होते. 105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमता असणाऱ्या कोयना धरणातून आतापर्यंत पूर्वेकडील सिंचन प्रकल्पासाठी केवळ 18.46 टीएमसी, पश्‍चिमेकडील वीज प्रकल्पासाठी 55.43 टीएमसी असा 73.89 टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. धरणात सध्या 53.61 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. धरणात 50 टीएमसी पाणीसाठा शिल्लक असल्याने यात घट होणे गरजेचे आहे. पावसाला दोन महिने शिल्लक असून, यावेळीसुध्दा 100 टक्के पर्जन्यमान असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. अगोदरच धरणात 50 टक्के पाणीसाठा असताना पुन्हा दमदार पाऊस होणार असल्याने धरणात येणारे पाणी साठवायचे कुठे ? असा प्रश्न कोयना धरण व्यवस्थापनास सतावू शकतो. यावेळीही धरण पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहणार असल्याने पुन्हा एकदा धरणातून नदीपात्रात पाणी सोडल्याने सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत जलप्रलय होण्याची भीती निर्माण झाली आहे. धरणातून पश्‍चिमेकडील व पूर्वेकडील प्रकल्पासाठी आतापासूनच जादा पाणीसाठा वापरण्यात आल्यास ते टाळता येणे शक्‍य आहे. 



कोयना धरणाची आजची (रविवार) स्थिती 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Why is kharif sowing delayed in Sangli?
Sangli Satara MLC election result 2026
Investigation Update: Mhamdya Nadaf’s Role in the Murder Conspiracy
Infrastructure Milestone: Trial Run on the 3.47km Karad Flyover
Marathi News Esakal
www.esakal.com