पश्चिम महाराष्ट्र

ब्रेकिंग : सातारा जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाबाधित कऱ्हाडला; केंद्रीय पथक करणार पाहणी

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : सातारा जिल्ह्यात 43 पैकी कऱ्हाड तालुक्‍यात कोरोनाबाधितांची संख्या 31 वर गेली आहे. त्यामुळे सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत कऱ्हाड तालुका हा कोरोनाचा हॉटस्पॉट झाला आहे. त्यामुळे केंद्रीय पथक चार किंवा पाच मे रोजी कऱ्हाडला भेट देऊन सद्यःस्थितीची पाहणी करणार आहे. त्यासाठी प्रशासन, आरोग्य विभाग आणि पोलिस यंत्रणा अलर्ट झाली आहे.
 
सातारा जिल्ह्यात सद्यःस्थितीत सर्वाधिक 31 कोरोनाबाधित रुग्ण कऱ्हाड तालुक्‍यात आहेत. त्यामध्ये म्हारुगडेवाडी, चरेगाव, बाबरमाची आगाशिवनगर (मलकापूर) व वनवासमाची, कापील, रेठरे बुद्रुक व सांगली जिल्ह्यातील कासेगाव आणि कामेरी येथील रुग्णांचा समावेश आहे. 

शहरापासून काही अंतरावरील ही गावे आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी खबरदारी म्हणून 23 एप्रिलपासून कऱ्हाड, मलकापूरसह परिसरातील 12 गावे 100 टक्के लॉकडाउन केली आहेत. शहरात रुग्ण सापडले नसले, तरी येथून जवळच असलेल्या मलकापूर- आगाशिवनगर, वनवासमाची येथील रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. त्यात आज आणखी एका रुग्णाची भर पडली आहे. त्यामुळे एकूण बाधित 31 झाले आहेत. त्याचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक चार किंवा पाच मे रोजी कऱ्हाडला भेट देऊन येथील परिस्थितीची पाहणी करणार आहे. 

घरी रहा सुरक्षित रहा : सातारकरांसह कऱ्हाडकरांसाठी महत्वाची बातमी 

योग्य भाव मिळत नाही तोवर कांद्याची विक्री बंद; शेतकरी ठाम 

कोरोनानंतर पश्‍चिम महाराष्ट्रापुढे हे असेल संभाव्य संकट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT