पश्चिम महाराष्ट्र

रस्त्यावर तडफडणाऱ्या वृद्धास डाॅक्टर काकांचा आधार

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड ः कोरोनामुळे सध्याचे दिवस अत्यंत सावधगिरीचे आहेत. कोरोनाच्या भीतीपोटी लोक एकमेकांशी बोलणेदेखील टाळतायत, तिथे कऱ्हाडच्या डॉ. दिलीप सोळंकी यांनी रस्त्यात वेदनेने तडफडणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकावर रस्त्यात उपचार करून वेगळ्या माणुसकीचा आदर्श घडविला. डॉ. सोळंकी यांनी त्या ज्येष्ठ नागरिकाला केवळ तपासलेच नाही तर त्यांना वडिलकीच्या नात्याने मानसिक आधार दिला.

उंब्रज येथील चाफळ फाट्यावर एका सायंकाळी घडलेल्या घटनेने डॉ. सोळंकी यांनी कोरोनाच्याही काळात माणुसकीचा मोठा संदेश दिल्याने त्यांचे कौतुक होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या शारीरिक अंतर ठेवत लोक एकमेकांशी हस्तांदोलनही टाळत आहेत. मात्र, डॉक्‍टर या नात्याने रस्त्यात वेदनेने व्याकूळत पडलेल्या वृध्द व्यक्तीला माणुसकीचा आधार देण्याचे काम डॉ. सोळंकी यांनी केले.

उंब्रज येथील मेडिकल कॅम्पमध्ये ते तपासणीला गेले होते. ते काम संपवून डॉ. सोळंकी, त्यांचे मित्र मुकुंद सोहनी पुन्हा कऱ्हाडला निघाले होते. त्यावेळी उंब्रजच्या वेशीवर त्यांना वृद्ध गृहस्थ रस्त्यावर आडवे पडलेले दिसले. ते वेदनेने व्याकूळ होऊन कळवळत होते. त्यांची ती स्थिती बघून डॉ. सोळंकी हे गाडीतून खाली उतरले. त्यांनी गृहस्थाची चौकशी केली. त्यांना उचलून रस्त्याच्या बाजूला आडोशाला घेतले. त्यांना स्वतःकडील औषधे दिली. त्यांनी त्यांच्या नातेवाईकांनाही बोलावले. त्या ज्येष्ठ नागरिकांच्या खुब्याचे हाड मोडले होते. ते लक्षात येताच त्यांनी तेथूनच रुग्णवाहिकेस कॉल केला. 

रुग्णवाहिका तेथेच येताच नागरिकांच्या मदतीने त्यांनी चालकाला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्याचे निर्देश दिले. तोपर्यंत त्या ज्येष्ठ नागरिकाचा मुलगा तेथे पोचला होता. त्याला सगळी परिस्थिती डॉक्‍टरांनी समजावली, काय नेमके करायचे, याची माहिती दिली. काही अडचण आल्यास त्वरित कॉल करा, असे म्हणत त्यांनी स्वतःचा मोबाईल नंबर देखील दिला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT