जीवे मारण्याचा प्रयत्न; परस्परविराेधी तक्रार;दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल; तिघांना पोलिस कोठडी

जीवे मारण्याचा प्रयत्न; परस्परविराेधी तक्रार;दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल; तिघांना पोलिस कोठडी
Updated on: 

कोरेगाव : शेत रस्ता खुला करायचा नाही, या कारणावरून आझादपूर (ता. कोरेगाव) येथील एका महिलेसह चौघांवर तलवार, लोखंडी गज, सत्तुर व कोयत्याने हल्ला करून गंभीर दुखापत करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दहा जणांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यापैकी तिघांना अटक झाली आहे. दरम्यान, याच कारणावरून तीन महिलांना शिवीगाळ, दमदाटी व हाताने मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ला करणाऱ्या संशयितांमध्ये राजेंद्र मुरलीधर भोसले, कुमार मुरलीधर भोसले, तानाजी मुरलीधर भोसले, सागर राजेंद्र भोसले, अमोल कुमार भोसले, सूरज तानाजी भोसले, संदीप ज्ञानदेव भोसले, अमित मारुती भोसले (सर्व रा. आझादपूर, ता. कोरेगाव) आणि पप्पू शिरतोडे व त्यासोबतचा एक जण (नाव माहीत नाही, रा. बोरजाईवाडी, ता. कोरेगाव) यांचा आहे. या हल्ल्यात संकेत अरुण बाबर, अक्षय अरुण बाबर, सूरज संजय बाबर, ऋतुजा अक्षय बाबर (सर्व रा. आझादपूर, ता. कोरेगाव) असे चौघे जण जखमी झाले आहेत.
 
यासंदर्भात संकेत बाबर यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे, की तीन दुचाकी गाड्यांवरून आलेल्या संशयितांनी शेत रस्ता खुला करायचा नाही, या कारणावरून शिवीगाळ, दमदाटी करत तलवार, लोखंडी गज, सत्तूर, कोयत्याने व लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करून गंभीर दुखापत केली आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केला.  (ता. 29) रात्री साडेआठच्या सुमारास फिर्यादी संकेत बाबर यांच्या घराबाहेर मारहाण झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी तिघा संशयितांना अटक झाली असून, त्यांना येत्या सहा तारखेपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. पोलिस उपनिरीक्षक विशाल कदम तपास करत आहेत.
 
दरम्यान, दुसरी फिर्याद सुरेखा राजेंद्र भोसले (रा. आझादपूर, ता. कोरेगाव) यांनी दिली आहे. त्यात म्हटले आहे, की माळ नावाच्या शिवारातील वाटेच्या कारणावरून झालेल्या
किरकोळ भांडणावरून संशयित अक्षय अरुण बाबर, संकेत अरुण बाबर, रूपेश संजय बाबर, सागर संजय बाबर, स्मितेश सुरेश बाबर, स्वप्नील सुरेश बाबर (सर्व रा. आझादपूर, ता. कोरेगाव) यांनी आपसात संगनमत करून (ता. 29) दुपारी साडेतीनच्या सुमाराम फिर्यादी सुरेखा भोसले यांच्या राहत्या घरात बेकायदेशीरपणे अनाधिकाराने प्रवेश केला आणि फिर्यादी सुरेखा भोसले, तसेच त्यांची जाऊ सविता तानाजी भोसले, जाऊ उषा कुमार भोसले यांना हाताने मारहाण केली. या भांडणात उषा यांच्या गळ्यातील मंगळसूत्र तुटले. या वेळी संशयितांनी शिवीगाळ दमदाटी करत घरातील माणसे कुठे आहेत, त्यांना जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. हवालदार जाधव तपास करत आहेत. 

काय सांगता ! दारू दुकानच अनलॉक व्हयं

बेजाबदारपणामुळे कऱ्हाडची कोरोनाची साखळी सातारला पाेहचली ?

गुड न्यूज : आता ‘कोविड-19’ चाचणीच्या सातारा जिल्ह्यातच; प्रयोगशाळेस मान्यता

सातारा जिल्हा हा रेड झाेनमध्ये गेला आहे. त्यातच शुक्रवारी रात्री उशिरा ५५ रुग्णांवरुन सातारा जिल्ह्यात ६९ इतके रुग्ण झाले. काय झाले नेमके, काेठे आढळले जादा रुग्ण वाचा सविस्तर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Miraj Ganesh Visarjan Political Controversy
Bomb Detection Squad Miraj ganeshotsav
Rare Smooth-Coated Otters Spotted in Sangli
Miraj Ganeshotsav 2026
Marathi News Esakal
www.esakal.com