जगतापवाडी (सातारा) - रस्त्यावर लावलेले हे फलक सर्वांच्या चर्चेचा विषय बनले आहेत. 
पश्चिम महाराष्ट्र

मतदान कमी झाल्याने... फंड आलेला नाही!

सकाळवृत्तसेवा

सातारा - जाहीर माफी....आपल्या विभागातून आमच्या उमेदवारास कमी मतदान झाल्यामुळे आपल्या विभागासाठी फंड आलेला नाही...असा फलक सातारा शहरालगतच्या जगतापवाडी येथील एका रस्त्यावर लावले आहेत. हे फलक कोणी लावलेत हे गुलदस्त्यात असले, तरी राजकारणी व्यक्ती मतदारांवर राग कशा प्रकारे व्यक्त करू शकते, याची ही सातारी तऱ्हा पाहायला मिळते; पण या फलकांची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे.

निवडणुकीत कोणत्या ठिकाणाहून कोणाला किती मतदान झाले याचे आकडे इलेक्‍ट्रॉनिक्‍स मतदान यंत्रे आल्यापासून सहजरीत्या मिळतात. याची माहिती निवडून आलेल्या उमेदवारांसह पराभूत उमेदवारही घेऊन कोणत्या ठिकाणाहून आपल्याला चांगले मतदान झाले. कोणी मतदान केले नाही, हे ही समजू शकते.

यातूनच सातारा शहरालगतचा त्रिशंकू भाग असलेल्या जगतापवाडी येथील एका रस्त्यावर आपल्या विभागातून आमच्या उमेदवारास कमी मतदान झाल्यामुळे आपल्या विभागासाठी फंड आलेला नाही... असे फलक लावले आहेत. हे फलक कोणी लावलेत हे गुलदस्त्यात असले, तरी सध्या या परिसरात या फलकांची मोठी चर्चा आहे. मुळात हा भाग गोडोली जिल्हा परिषद गट व पंचायत समिती मतदारसंघात येतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये खोल दरीत बस कोसळली; 4 जवान ठार, ३१ जखमी

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT