sable
sable 
पश्चिम महाराष्ट्र

साबळेंच्या "शायनिंग'ला देशमुखी झटका 

संतोष सिरसट

सोलापूर : खासदार अमर साबळे यांनी मागील आठवड्यात सोलापुरात तीन दिवसीय शायनिंग महाराष्ट्र या महाप्रदर्शनाचे आयोजन केले होते. प्रदर्शनापूर्वी केलेल्या जाहिरातीत त्यांनी जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांची छायाचित्रे प्रसिद्ध केली होती. एवढेच नाही तर एका मंत्र्यांना उद्‌घाटनाला तर दुसऱ्या मंत्र्यांना समारोपाला येण्याचे निमंत्रणही त्यांनी दिले होते. मात्र, साबळेंच्या या "शायनिंग'ला दोन्ही देशमुखांनी झटकाच दिल्याचे दिसले. 

खासदार साबळे यांच्यावर सोलापूर लोकसभा मतदार संघाची जबाबदारी पक्षाने दिली आहे. त्यामुळे अलीकडील काळात त्यांचे सोलापूर जिल्ह्यातील दौरे वाढले आहेत. त्यातच मागील साडेचार वर्षांत केंद्र व राज्य सरकारने सुरू केलेल्या वेगवेगळ्या योजनांची माहिती सोलापूरवासीयांना होण्यासाठी त्यांनी शायनिंग महाराष्ट्र या प्रदर्शनाचे आयोजन केले होते. श्री. साबळे यांच्या नावाची चर्चा सोलापूर लोकसभेसाठी जोर धरत आहे. त्यामुळेच या प्रदर्शनाच्या जाहिरातींमधून त्यांनी भाजपचे खासदार शरद बनसोडे यांना दूर ठेवले होते. एकीकडे बनसोडे यांना दूर ठेवताना सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची छायाचित्रे त्यांनी जाहिरातीत प्रसिद्ध केली होती. प्रदर्शनाचे उद्‌घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते ठरले. पण, उद्‌घाटनाच्या कार्यक्रमाला पालकमंत्री देशमुख आलेच नाहीत. त्याचबरोबर समारोप कार्यक्रमासाठी सहकारमंत्र्यांना निमंत्रण दिले होते. मात्र, सहकारमंत्र्यांनी साबळेंच्या "शायनिंग'च्या समारोपाकडे पाठ फिरवली. दोन्ही मंत्र्यांनी "शायनिंग'कडे पाठ फिरवल्याने त्याची वेगळीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.

दोन्ही देशमुखही साबळेंना नाकारत आहेत का? असाही प्रश्‍न आता उपस्थित होत आहे. एकीकडे असे असले तरी खासदार साबळे यांचे सोलापूरचे दौरे वाढतच आहेत. भाजपच्या वतीने कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. त्यात खासदार साबळे हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आहेत. त्यामुळे साबळेंच्या या "शायनिंग'कडे दोन्ही देशमुखांनी जाणूनबुजून पाठ फिरवली की अन्य काही कार्यक्रमांमुळे ते येऊ शकले नाहीत. याबाबत तर्क-वितर्क सुरू आहेत. काहीही असो, खासदार साबळे यांनी कितीही सांगितले की मी सोलापूर लोकसभा लढविणार नाही. पण, त्यावर सध्या कोणी विश्‍वास ठेवायला तयार नाही. खासदार साबळे यांच्या प्रत्येक कृतीतून त्यांनी सोलापूर लोकसभेचाच मार्ग अवलंबल्याचे स्पष्ट जाणवते. सोलापूर लोकसभेची वाट चोखाळताना श्री. साबळे यांना दोन्ही देशमुखांना विश्‍वासात घेऊनच पुढील निर्णय घेणे योग्य होईल, अशी चर्चा भाजप कार्यकर्त्यांत सुरू आहे. मागील आठवड्यात भारिपचे प्रकाश आंबेडकर यांचीही सभा सोलापुरात झाली. माजीमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही ग्रामीण भागात दौरे सुरू केले आहेत. त्यामुळे सोलापूर लोकसभेचे वातावरण आता तापू लागल्याचे दिसून येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election : प्रचाराचे वादळ थंडावले ; सातव्या टप्प्यासाठी उद्या मतदान

Kalyani Nagar Accident :भ्रष्ट चेल्यांनी बदलले तिघांचे रक्तनमुने ; ‘ससून’मधील डॉक्टरांची बनवाबनवी

Pune Accident : पुण्यात पुन्हा रॅश ड्रायव्हिंग ; बीआरटी मार्गात घुसवली मोटार

World No Tobacco Day 2024 : हृदय-फुफ्फुसांपासून ते कर्करोगापर्यंत, धूम्रपानामुळे ‘या’ गंभीर आजारांना मिळतेय आमंत्रण

World No Tobacco Day 2024: ‘तंबाखू’वर मात शक्य! हवा फक्त दृढनिश्चय; ‘आरोग्य’ विभागाकडून 2 वर्षात दीड लाखावर समुपदेशन

SCROLL FOR NEXT