Shivathali's decision on Monday 
पश्चिम महाराष्ट्र

नगरच्या शिवथाळीचा सोमवारी निर्णय 

सकाळ वृत्तसेवा

नगर : ""गरिबांना अल्पदरात भोजन देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवभोजन योजनेची घोषणा केली. ही योजना प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यासाठी सहा ते सात प्रस्ताव आले आहेत. त्यावर सोमवारी (ता. 6) निर्णय घेण्यात येईल. त्यासाठी सक्षम चालकांची शोध मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. बसस्थानक, रेल्वेस्थानक, शासकीय कार्यालये, बाजारपेठा आदी वर्दळीच्या ठिकाणीच शिव भोजनालय योजना सुरू करण्यात येईल,'' अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी गरजूंना अल्पदरात भोजन उपलब्ध करण्याची ग्वाही दिली. त्यानुसार नववर्षाच्या पहिल्याच दिवशी निर्णय जारी केला. पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्त्वावर जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी शिव भोजनालय सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर मिळणारा प्रतिसाद पाहून योजनेचा विस्तार केला जाईल. भोजनालय चालवण्यासाठी खानावळी, भोजनालय, रेस्टॉरंट, स्वयंसेवी संस्था, महिला बचतगट आदींना प्राधान्य दिले जाणार आहे. सक्षम चालकांची निवड जिल्हास्तरीय समितीकडून होणार आहे. समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी द्विवेदी आहे. 

नाममात्र शुल्क आकरण्यात येईल 
गरजूंकडून थाळीसाठी दहा रुपये नाममात्र शुल्क घेण्यात येणार आहे. उर्वरित रक्कम अनुदानाच्या रूपात संबंधित चालकांना मिळणार आहे. यासाठीचा निधी अन्न व नागरी पुरवठा विभागातर्फे थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात येईल. प्रायोगिक तत्त्वावर सुरू होणाऱ्या योजनेची जिल्ह्यात पथदर्शी अंमलबजावणी करण्यासाठी पुरवठा विभागाने पाऊल उचलले आहे. त्यासाठी पुरवठा विभागातील अधिकारी मागील तीन दिवसांपासून प्रत्यक्ष माहिती घेत आहेत. गरजूंना योग्य दर्जाचे भोजन उपलब्ध होण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून अंमलबजावणीसाठी सतर्कता बाळगण्यात येत आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांना "नो एन्ट्री' 
शिवभोजनाची वेळ दुपारी 12 ते 2 असणार आहे. एका भोजनालयात कमीत-कमी 75, जास्तीत-जास्त 150 थाळीचे भोजन राहणार आहे. भोजनालयात शासकीय कर्मचाऱ्यांना जेवण्यास सक्त मनाई आहे. दुर्दैवाने अन्नातून विषबाधा झाल्यास याची जबाबदारी चालकाकडे राहील. अन्नाचा दर्जा अन्न व औषध प्रशासनाकडून तपासण्यात येणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनलाइन ग्रोसरी ऑर्डर करण्याआधी सावधान! Blinkit च्या फ्रीजरमध्ये जिवंत उंदीर आढळला; स्टोअरचा व्हिडिओ व्हायरल

पेपरमध्ये ढीगभर चुका, UGC-NET परीक्षेचे तीन पेपर पुन्हा होणार, तारीखही जाहीर...

Rohit Sharma: बाप रे बाप...! सायकलवरून हजारो किमीचा प्रवास करून आलेल्या फॅनला भेटल्यावर कशी होती रोहितची रिअ‍ॅक्शन, Viral Video

Phone Charging Tips: Airplane Mode ON करून फोन चार्ज केला तर काय होतं? जाणून घ्या

Shirur Bypass Crash: शिरूर बायपासवर पुन्हा बळी; तुटलेल्या दुभाजकातून दुचाकी नेणे जीवावर बेतले

SCROLL FOR NEXT