esakal | पाहा कोण म्हणतयं: सरकार उद्यापासून सुरळीत 
sakal

बोलून बातमी शोधा

Government will start tomorrow: Patel

सरकारमधील खाते वाटपाचा तिढा सुरू असताना आज राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी शिर्डी येथे साई बाबांचे दर्शन घेतले. राज्य सरकार उद्यापासून सरकार सुरळीत होईल आणि हे सरकार पाच वर्ष राहील, असा दावा त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला. 

पाहा कोण म्हणतयं: सरकार उद्यापासून सुरळीत 

sakal_logo
By
सतीश वैजापूरकर

शिर्डी : राज्यात तीन पक्षांचे सरकार पहिल्यांदा आले आहे. छोट्या-मोठ्या अडचणी असतातच. दोन दिवसांत खातेवाटप सुरळीत होईल. सोमवारपासून सर्व मंत्री कामकाज पाहतील, असा विश्‍वास माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर केवळ सावरकरच नव्हे, तर कुठल्याही देशभक्त व महान व्यक्तीबद्दल आक्षेप घेणे अथवा वाद-विवाद करणे योग्य नाही, अशी राष्ट्रवादी कॉंग्रेसची भूमिका आहे, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

येथे क्‍लिक करा साईंच्या झोळीत साडेसतरा कोटींचे दान 

आज पटेल यांनी साईसमाधीचे दर्शन घेतले. साई संस्थानचे माजी विश्‍वस्त बिपिन कोल्हे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश गोंदकर, उपनगराध्यक्ष नीलेश कोते, दीपक गोंदकर आदी पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. साई संस्थानचे कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी साई संस्थानच्या वतीने त्यांचे स्वागत केले. 

हे पाहा यासाठी काढली जिवंतपणी अंत्ययात्रा 

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की भाजपने एकाही राजकीय पक्षाला विश्‍वासात न घेता नागरिकत्व सुधारणा कायदा मंजूर केला. त्यामुळे देशातील शांतता बिघडली. या कायद्याच्या विरोधातील आंदोलनात युवकवर्गाची वाढती संख्या चिंतेची बाब ठरली. महागाई, शेतकरी व मंदीसारख्या समस्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी त्यांनी हा कायदा आणला. मात्र, एनआरसीमुळे एकट्या आसाममध्ये सोळा लाख हिंदू, एक लाख गुरखा व दोन लाख मुस्लिमांच्या नागरिकत्वाचा प्रश्‍न निर्माण झाला. हा कायदा लगेचच आणि घाईने आणण्याची गरज नव्हती. 

हे महत्त्वाचे मंत्री गडाखांच्या डोक्‍यावर अण्णांचा हात

राज्यातील तीन राजकीय पक्षांचे सरकार हे समान कार्यक्रमावर आधारित आहे. त्या आधारे ते सुरळीत चालेल. पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करील, असा दावा त्यांनी केला. या वेळी साई कोतकर, प्रसाद पाटील, किरण माळी व संजय कोतकर आदी उपस्थित होते. 

हे वाचलेच पाहिजे न्यायिक मानक कायदा लागू करावा 

फुटबॉल टीमची प्रगती 
भारताच्या फुटबॉल टीमचे जागतिक मानांकन एकशे शहात्तरवरून चवऱ्यान्नवपर्यंत आले. युवा खेळाडूंच्या संघांची प्रगती लक्षात घेता पुढील पाच वर्षांत भारताचा फुटबॉल संघ जागतिक स्पर्धेत चांगली कामगिरी करेल, असा विश्‍वास माजी मंत्री पटेल यांनी या वेळी व्यक्त केला. 
 

 
 

loading image