कामगारमंत्री मुश्रिफांच्या घरावर काढणार 50 हजार बांधकाम कामगांराचा मोर्चा!
कामगारमंत्री मुश्रिफांच्या घरावर काढणार 50 हजार बांधकाम कामगांराचा मोर्चा! Canva
सोलापूर

कामगारमंत्री मुश्रिफांच्या घरावर काढणार 50 हजार कामगांराचा मोर्चा!

श्रीनिवास दुध्याल

सोलापुरात आज बांधकाम कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय येथे धरणे आंदोलन करण्यात आले.

सोलापूर : बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात (Construction Workers Welfare Board) 11 हजार कोटी रुपये जमा आहेत. त्या जमा रकमेतून यंदाच्या दिवाळीला बांधकाम कामगारांना 10 हजार रुपयांची भेट देण्यात यावी. तसेच बांधकाम कामगार नोंदणीसाठी लादण्यात आलेल्या जाचक अटी रद्द कराव्यात व सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली काढावीत; अन्यथा 29 ऑक्‍टोबर रोजी राज्यभरातील 50 हजार बांधकाम कामगारांना घेऊन राज्य कामगार मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरावर मोर्चा काढू, असा इशारा सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (Center of Indian Trade Unions) (सिटू)चे राज्य महासचिव ऍड. एम. एच. शेख (M. H. Shaikh) यांनी दिला आहे.

आज (ता. 18) सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सिटू) च्या वतीने मागणी दिवस पाळण्याची हाक देण्यात आली होत. त्या अनुषंगाने सोलापुरात आज बांधकाम कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय येथे धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी सिटूचे राज्य महासचिव ऍड. एम. एच. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. अब्राहम कुमार, शंकर म्हेत्रे, सिद्राम म्हेत्रे, अमित मंचले, श्रीकांत कांबळे, युवा महासंघाचे जिल्हा सचिव अनिल वासम, चिदानंद चानापागुल, तानाजी जाधव, भास्कर कुनशीकर यांच्या शिष्टमंडळाने नोंदणी अधिकारी तथा दुकाने निरीक्षक ए. जी. पठाण यांना निवेदन दिले.

'या' आहेत मागण्या

बांधकाम कामगारांची ऑनलाइन नोंदणी व पुनर्नोंदणी तत्काळ व्हावी अथवा ऑनलाइन अर्ज स्वीकारावे. कामगारांची विविध प्रलंबित प्रकरणे व थकीत लाभांची त्वरित पूर्तता करावी. अवजारे खरेदी लाभाची प्रलंबित प्रकरणे त्वरित मंजूर करावीत. कोविड-19 चे थकीत अनुदान त्वरित द्यावे. पाच वर्षांची नूतनीकरण वर्गणी भरलेल्या नोंदणीकृत कामगारांना सर्व अनुदान अदा करावे. तसेच थकीत प्रसूती लाभ, पाल्यांची शिष्यवृत्ती तातडीने अदा करावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Boiler blast in Sonipat: डोंबिवलीतील घटना ताजी असताना आणखी एका कारखान्यात बॉयलरचा स्फोट; ४० कामगार होरपळले, 8 जण गंभीर

Gautam Gambhir : गंभीरने सहा महिन्यांपूर्वी केलेल्या 'त्या' मेसेजबद्दल KKR च्या नितीश राणाचा खुलासा; काय लिहिलेलं त्यात?

Latest Marathi Live News Update : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भिमाशंकरला भाविकांसह पर्यटकांची तुफान गर्दी

Nashik Crime News : माजी महापौर अब्दुल मलिक गोळीबार प्रकरणी दोघांना अटक; हल्ला व्यावसायिक वादातून

Porsche Accident : 'ससून'च्या चौकशी समितीला बिर्याणीची मेजवाणी; पुण्यातल्या 'या' प्रसिद्ध हॉटेलातून आलं पार्सल

SCROLL FOR NEXT