सोलापूर

हन्नुर येथे विजेचा धक्का लागून मुलाचा मृत्यू

सकाऴ वृत्तसेवा

ही घटना मंगळवारी हन्नुर येथील राहत्या घरात सकाळी घडली.

अक्कलकोट (सोलापूर) : तालुक्यातील हन्नुर (hunnur) येथील प्रसाद धर्मण्णा हाताळे (वय १७) याचा घरात लाईटचे बटण बंद करत असताना विजेचा धक्का (electric shock) बसून मृत्यू (Died) झाला. ही घटना मंगळवारी हन्नुर येथील राहत्या घरात सकाळी घडली. याची उत्तर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. (a child has died in an electric shock in hunnur)

याबाबत माहिती अशी की, या घटनेतील मृत व्यक्तीचे नाव प्रसाद धर्मण्णा हाताळे (वय १७) असे असून मृत व्यक्ती हा दयानंद महाविद्यालयात बी एससी प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. सध्या लॉकडाउनमुळे तो अनेक दिवसांपासून मुळ गावातल्या घरीच राहण्यास आला होता. सकाळच्या वेळी प्रसाद घरातील लाईटचे बटन बंद करत असताना अचानक विजेचा धक्का बसल्याने जखमी झाला.

ही माहिती लिंबण्णा सिद्धाराम हाताळे यांना सकाळी शेतात काम करत असताना त्यांचे सख्खे भाऊ प्रवीण हाताळे यांनी फोनवर सांगितले. त्यानंतर जखमी प्रसादला हन्नुर येथे उपचारासाठी दाखवण्यात आले. पण डॉक्टर अक्कलकोटला घेऊन जाण्यास सांगितल्यानंतर अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून मयत घोषित केले. प्रसादच्या पश्चात आई, वडील व एक बहीण असा परिवार आहे. प्रसादच्या मृत्यमुळे गावावर शोककळा पसरली होती. सदर घटनेची माहिती लिंबण्णा सिद्धाराम हाताळे यांनी अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात दिली आहे. (a child has died in an electric shock in hunnur)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT