बालविवाह वाढूनही बाल कल्याण समित्या झोपलेल्याच

बालविवाह
बालविवाहMedia Gallery
Summary

बालविवाह रोखण्यासाठी गाव, तालुका व जिल्हा पातळीवर बाल संरक्षण समिती कार्यरत असतानाही त्यांच्याकडून काहीच कार्यवाही होताना दिसत नाही.

सोलापूर : मुलीच्या हातात ज्या वयात वही-पेन, पुस्तक असायला हवे, त्याच वयात तिच्या खांद्यावर अचानकपणे संसाराची जबाबदारी पडू लागली आहे. मागील वर्षभरात राज्यातील तीन हजारांहून अधिक बालविवाह (child marriage) बाल कल्याण समितीने (Child Welfare Committee) रोखले. मात्र, खेड्यापाड्यात मोठ्या प्रमाणावर गुपचूप विवाह उरकले जात आहेत. दरम्यान, बालविवाह (child marriage) रोखण्यासाठी गाव, तालुका व जिल्हा पातळीवर बाल संरक्षण समिती कार्यरत असतानाही त्यांच्याकडून काहीच कार्यवाही होताना दिसत नाही. (child marriage has increased during the corona period)

बालविवाह
कोरोनाच्या मृत्यूपासून एक लाख सहा हजार व्यक्‍ती सुरक्षित

कोरोनामुळे पालकांचे हातावरील पोट उपाशी राहिल्याने बहुतेक पालक मुलगी सातवी, आठवीत शिकत असतानाही विवाह लावून देत आहेत. नववी, दहावीतील मुलींची शिकायची इच्छा असतानाही पालकांपुढे त्यांचे काहीच चालत नसल्याचीही वस्तुस्थिती आहे. शिक्षण घेऊनही पुढे नोकरी मिळत नाही, मग आता चांगले स्थळ आले म्हणून विवाह उरकले जात असल्याचे कारणही कारवाई करताना समोर आले आहे. तर कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पालक दिवसभर घराबाहेर असतात आणि त्यावेळी वयात आलेली मुलगी घरात एकटीच असते. त्या मुलीच्या काळजीतून पालक बाल वयातच तिचा विवाह लावत आहेत.

बालविवाह
हाताला काम नाही अन्‌ कोरोनामुळे जीणे झाले मुश्‍किल

ग्रामीण भागात अशी परिस्थिती असतानाही बाल संरक्षण समित्यांचे अस्तित्व त्याठिकाणी दिसत नाही. सोलापूरच्या कार्यालयात बसलेल्या अधिकाऱ्यांकडे तक्रार आल्यानंतरच त्यांच्याकडून कारवाई केली जाते. इतरवेळी मात्र, गुपचूप बालविवाह उरकले जात असतानाही गाव, तालुका, जिल्हा स्तरावरील या समितीचा एकही सदस्य त्याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे चित्र आहे.

बालविवाह
आरोग्याधिकाऱ्यांचे छाटले पंख! बदली अन्‌ औषध खरेदीचे काढले अधिकार

छोट्या कार्यक्रमातच उरकले जाताहेत विवाह

देवकार्य, बोकड कापण्याचा कार्यक्रम घेण्याच्या निमित्ताने मोजक्‍याच पै-पाहुण्यांना बोलावून बालविवाह उरकले जात आहेत. बालविवाह करताना कायदेशीर अडचण येणार नाही, याची खबरदारी घेत पालक, मुलीचे नातेवाईक तिच्या आधार कार्डवरील तारीखही बदलत आहेत. मात्र, शाळेच्या दाखल्यावरून ती मुलगी 18 वर्षांखालील असल्याचे समोर आले आहे. अकलूज येथील एका बालविवाहावेळी बाल कल्याण समितीला त्याचा अनुभव आला.

बालविवाह
'MPSC'ने वर्षापूर्वी शिफारस करुनही 413 उमेदवारांना नियुक्ती नाहीच

बालविवाहात जिल्ह्यातील सहा तालुके अव्वल

मागील वर्षभरात चाईल्ड लाईनवरून आलेल्या तक्रारीनुसार केवळ 75 ते 80 विवाह रोखले आहेत. जिल्ह्यातील माळशिरस, मंगळवेढा, मोहोळ, अक्‍कलकोट, दक्षिण, उत्तर सोलापूर या तालुक्‍यात सर्वाधिक बालविवाह झाल्याची माहिती जिल्हा बाल संरक्षण समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. अशी परिस्थिती असतानाही या समितीच्या वरिष्ठांनी संबंधित गावे, तालुकास्तरीय बाल संरक्षण समितीच्या सदस्यांना काहीच सूचना केलेल्या नाहीत, अशीही चर्चा आहे. गावस्तरावरील समितीत ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, सरपंच, पोलिस पाटील, शाळांचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य तर तालुकास्तरीय समितीत तहसिलदार, गटविकास अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, पंचायत समितीचे काही सदस्य काम करतात. मात्र, या समित्या कागदावरच असून त्यांचे प्रत्यक्षात काहीच काम दिसत नाही. (child marriage has increased during the corona period)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com