accident
accident sakal
सोलापूर

Mohol Accident : पालखी मार्गावर सख्ख्या भावांचा अपघात; एकाचा मृत्यू तर एक जखमी

राजकुमार शहा

मोहोळ - भरधाव जाणाऱ्या कारने ओव्हरटेक करण्याच्या नादात मोटरसायकलला जोराची धडक देऊन झालेल्या अपघातात एकाचा जागेवरच मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला. हा अपघात मोहोळ-पंढरपूर पालखी मार्गावरील पेनुर शिवारात गुरुवार ता. 26 रोजी सकाळी पावणे दहा वाजता झाला. भागवत लक्ष्मण राऊत (वय-45) रा. वेताळवाडी, ता. माढा असे मृताचे नाव आहे, तर औदुंबर लक्ष्मण राऊत (वय-40) रा. वेताळवाडी असे जखमीचे नाव आहे. दोघे ही सख्खे भाऊ आहेत.

मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, मृत व जखमी हे गुरुवारी सकाळी मोटरसायकल क्रमांक एमएच-12 एझेड 3067 वरून व्हळे, ता. पंढरपूर येथील नातेवाईकाच्या तिसऱ्या दिवसाच्या विधी कार्यासाठी गेले होते.

विधीकार्य उरकुर परत येताना त्यांची मोटरसायकल मोहोळ-पंढरपूर पालखी मार्गावरील पेनुर शिवारातील पाटकुल फाट्यासमोर येतात भरधाव येणाऱ्या कार क्र. एमएच-12 एचझेड 9094 हीने डाव्या बाजूने येऊन ओव्हरटेक करण्याच्या नादात मोटरसायकलला मध्यभागी जोराची धडक दिली, त्यात भागवत राऊत हे रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्यास, पायास मार लागल्याने ते गंभीर जखमी होऊन जागीच मृत झाले. तर औदुंबर राऊत हे जखमी झाले.

अपघात होताच कार चालक कार सोडून पळून गेला. या अपघाताची फिर्याद औदुंबर लक्ष्मण राऊत यांनी मोहोळ पोलिसात दिली असून, अधिक तपास अपघात पथकाचे पोलीस उपनिरीक्षक ज्योतिबा पवार हे करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election : प्रचाराचे वादळ थंडावले ; सातव्या टप्प्यासाठी उद्या मतदान

Kalyani Nagar Accident :भ्रष्ट चेल्यांनी बदलले तिघांचे रक्तनमुने ; ‘ससून’मधील डॉक्टरांची बनवाबनवी

Pune Accident : पुण्यात पुन्हा रॅश ड्रायव्हिंग ; बीआरटी मार्गात घुसवली मोटार

World No Tobacco Day 2024 : हृदय-फुफ्फुसांपासून ते कर्करोगापर्यंत, धूम्रपानामुळे ‘या’ गंभीर आजारांना मिळतेय आमंत्रण

World No Tobacco Day 2024: ‘तंबाखू’वर मात शक्य! हवा फक्त दृढनिश्चय; ‘आरोग्य’ विभागाकडून 2 वर्षात दीड लाखावर समुपदेशन

SCROLL FOR NEXT