gardi2.jpg 
सोलापूर

लॉकडाउन संपल्यानंतर व्यापारी व नागरिकांच्या बेशिस्तीने शहर पुन्हा गर्दीत अडकले ! वाचा सविस्तर 

प्रकाश सनपूरकर

सोलापूरः शहरात लॉकडाउन संपल्यानंतर सम-विषम तारखेनुसार दुकाने उघडण्याचा नियम बाजारपेठेतील अनेक भागात पाळला गेला नाही. त्यामुळे बाजारात सर्वच दुकाने उघडी होताच खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी व वाहनामुळे ट्रॅफिक जाम असे प्रकार सूरू होते. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर दुपारी पोलिसांनी सम विषम तारखाचे वेळापत्रक अमंलात आणण्यासाठी काही दूकाने बंद करण्यास सुरुवात केली.

लॉकडाउन उघडल्यानंतर पहिल्या दिवशी केवळ भाजीपाला व किराणा खरेदीची परवानगी दिली होती. आजपासून सम विषम तारखांच्या नियोजनानुसार दुकाने उघडणे अपेक्षित होते. त्या बाबतची स्पष्ट सुचना प्रशासनाकडून व्यापाऱ्यांना मिळाली नव्हती. पण लॉकडाउन पुर्वीची समविषम तारिख नियोजनाचे वेळापत्रक पुन्हा सुरू व्हायला हवे. विजापुर रोडवर काही भागात हे वेळापत्रक पाळून काही दूकाने बंद ठेवण्यात आली. मात्र मधला मारोती मार्केट, कुंभारवेस, पुर्वमंगळवार पेठेसह अनेक भागात दोन्ही बाजुची दुकाने उघडीच होती. सर्वच वस्तु व सेवांची दुकाने उघडी असल्याने मनसोक्त खरेदीसाठी लोक रस्त्यावर आलेले होते. 

त्यामध्ये राखी पोर्णिमेच्या राखी खरेदीसाठी महिलांची काही प्रमाणात गर्दी होती. सोन्या चांदीची दुकाने, किराणा, जनरल वस्तु, ठोक वस्तुचे व्यापारी, दुरुस्तीची दुकाने, रस्त्यावर बसलेले लहान विक्रेते, मिठाई दुकाने, चहा स्टॉल, नाश्‍ता स्टॉल, झेरॉक्‍स आदी सर्वच दुकानावर खरेदी व इतर कामासाठी लोक थांबलेले होते. 
चहा व नाश्‍त्याच्या दुकानांवर मास्क बाजूला ठेवत गप्पा मारत नागरिक चहाचा आनंद घेत होते. ज्या दुकानदारांनी दोरी बांधून सुरक्षीत अंतराची सोय केली होती त्या ठिकाणी सोशल डिस्टन्स पाळला जात होता. ठोक विक्रेत्याकडून माल नेण्यासाठी किरकोळ व्यापारी वाहने लावून दुकानावर गर्दीमध्ये थांबलेले होते. काही ठोक व्यापाऱ्यानी शटर बंद करून केवळ बाहेरच्या टेबलजवळ ग्राहकांना थांबवून मालाची डिलिव्हरी दिली. उत्साहाच्या भरात फिरणारे वाहनचालक, माल वाहने व पादचारी यांच्यामुळे अनेक भागात वाहने गर्दीत अडकत होती. एका वस्तुच्या खरेदीसाठी ग्राहकासोबत दोन ते तीन माणसे दुकानात येत होती. बाजारातील गर्दी वाढत असल्याने दुपारी समविषम तारिख वेळापत्रक अमंलबजावणीसाठी पोलिसांनी दुकाने बंद करण्याची मोहिम हाती घेतली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

England vs Argentina: ७ मिनिटांत मॅच फिरवली! अर्जेंटिनाची फायनलमध्ये धडक; इंग्लंडचे ६० वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न भंगले

भारतावर शंभर टक्के आयात शुल्क लावण्याचं अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक; रशियाच्या तेल खरेदीवरुन पाच देशांवर संकट?

Kannad Water Supply Scheme : कन्नड शहरासाठी ५६ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर! ​आमदार संजना जाधव यांच्या पाठपुराव्याला यश

Tukaram Mundhe: सिया गोयलच्या कुटुंबियांना तुकाराम मुंढेंच्या पथकाचा दणका; पुण्यातलं दुकान केलं सील, आठ लाखांचा माल जप्त

Mangalwedha News : स्व. नागनाथ आण्णाचा पाण्याचा लढा पुढे कायम ठेवू; प्रा. शिवाजीराव काळुंगे

SCROLL FOR NEXT