Madha Murder 
सोलापूर

धक्कादायक : निर्घृणपणे खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी टेम्पोसह मृतदेह जाळण्याचा प्रयत्न ! माढा तालुक्‍यातील घटना 

संतोष पाटील

टेंभुर्णी (सोलापूर) : माढा तालुक्‍यातील शिराळ (टें) येथील संजय मारुती काळे (वय 52) यांचा अज्ञात आरोपींनी शेवरे (ता. माढा) हद्दीतील उजनी कालव्याच्या बाजूस नेऊन अज्ञात कारणासाठी अज्ञात हत्याराने तोंडावर व गळ्यावर वार करून निर्घृण खून केला. मारेकऱ्यांनी अंगावर स्टेफनी ठेवून त्यांचा मृतदेह व टेम्पो जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी (ता. 25) रात्री नऊ ते रविवारी (ता. 26) सकाळपर्यंत घडली. याप्रकरणी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

याविषयी पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, शिराळ (टें) येथील संजय मारुती काळे यांचा खारी, टोस्ट, बेकरी उत्पादने विक्रीचा व्यवसाय होता. ते शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास जेवण करून झोपण्यासाठी त्यांच्या खोलीत गेले होते. त्यानंतर सकाळी ते घरात नसल्याचे कुटुंबीयांच्या निदर्शनास आले. तसेच त्यांचा मोबाईल बंद होता. शिवाय त्यांचा टेम्पोही (एमएच 45 - 6577) ही घरासमोर दिसला नाही. त्यामुळे त्यांच्या नातेवाइकांनी शोधाशोध सुरू केली. रविवारी सकाळी टेंभुर्णी-अकलूज रस्त्यावरील शेवरे येथे उजनी कालव्याच्या भराव्यानजीक छातीच्या खालचा भाग पूर्णपणे जळालेल्या अवस्थेतील अनोळखी इसमाचा मृतदेह व जळालेल्या स्थितीतील टेम्पो दिसला. मारेकऱ्यांनी तीक्ष्ण हत्याराने त्यांच्या तोंडावर व गळ्यावर वार केले होते. तसेच मृतदेहावर स्टेफनी टाकून जाळण्याचा प्रयत्न केला होता. या मृतदेहाचा छातीचा खालचा संपूर्ण भाग जळून कोळसा झालेला होता व वरील चेहऱ्याचा भाग तेवढा वाचला होता. 

दरम्यान, संजय काळे यांची शोधाशोध करीत असताना शेवरे येथे मृतदेह मिळून आल्याची माहिती समजल्याने नातेवाइकांनी तो मृतदेह पाहिला असता, संजय काळे यांचाच तो मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. संजय काळे यांचा एवढ्या निर्दयीपणे कोणी व का खून केला हा यक्ष प्रश्न पोलिसांपुढे आहे. दरम्यान, टेंभुर्णी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेऊन तो टेंभुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उत्तरीय तपासणीसाठी आणला. त्या वेळी तेथे शिराळ (टें) ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. 

मृत संजय काळे यांची शिराळ (टें) येथे शेती असून ते पत्नी, दोन मुले व सून यांच्यासह राहात होते. याप्रकरणी आकाश संजय काळे (वय 20) यांनी टेंभुर्णी पोलिीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांनी घटनास्थळास भेट दिली असून तपासकामी सूचना दिल्या आहेत. या गुन्ह्यातील आरोपींचा छडा लावण्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशील भोसले व सहाय्यक पोलिस निरीक्षक अमित शितोळे यांच्या नेतृत्वाखाली दोन तपास पथके तयार करण्यात आली असून, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील व अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच गुन्ह्याचा छडा लावणार असल्याचे टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी सांगितले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT