Crime News  esakal
सोलापूर

ST Driver : लग्नाचं आमिष दाखवून एसटी चालकानं लॉजवर केला विवाहितेवर अत्याचार, सोने-चांदीचे दागिने घेऊन झाला पसार

चालकावर बार्शी शहर पोलिस ठाण्यात फसवणूक व अत्याचाराचा गुन्हा दाखल

सकाळ डिजिटल टीम

पाटीलने वारंवार संपर्क साधत पंढरपूर, बार्शी येथील तीन नामांकित लॉजवर अत्याचार केले.

Crime News : विवाहितेस लग्नाचं (Marriage) आमिष दाखवून पंढरपूरच्या कंत्राटी एसटी चालकानं वारंवार अत्याचार केला, तसंच बार्शीला आल्यानंतर भेटला, त्यावेळी सोने-चांदीचे दागिने घेऊन पसार झाला. त्याच्यावर बार्शी शहर पोलिस ठाण्यात फसवणूक व अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.

विकास पांडुरंग पाटील (वय २६, रा. शेवते, ता. पंढरपूर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित कंत्राटी एसटी चालकाचे नाव आहे. ही घटना मे २०२२ ते ४ ऑगस्ट २०२३ दरम्यान घडली. पीडित महिलेने पोलिसांत (Barshi City Police Station) फिर्याद दाखल केली.

पंढरपूर येथून दररोज बसने नोकरीच्या ठिकाणी जाणे-येणे असल्याने त्या महिलेची कंत्राटी चालक विकास पाटीलशी ओळख झाली. त्याने तिचा फोन नंबर घेतला. दोघांचे सोशल मीडियावर चॅटिंग सुरू झाले. मला तू खूप आवडतेस, तू माझ्याशी लग्न कर, असे त्याने म्हणताच, माझा विवाह होऊन मला मुले असल्याचे तिने सांगितले.

पण, पाटीलने वारंवार संपर्क साधत पंढरपूर, बार्शी येथील तीन नामांकित लॉजवर अत्याचार केले. शुक्रवारी (ता. ४) बार्शीत त्याने येऊन लग्नाचे आमिष दाखवून लॉजवर अत्याचार केला. मंगळसूत्र, कर्णफुले, पैंजण घेऊन पसार झाला असून, फोन केला तरी उचलत नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलिस निरीक्षक दिलीप ढेरे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: उत्सवांवर निर्बंध नाहीत, पण अन्नात भेसळ नकोच! तुकाराम मुंढेंचं FDAच्या आदेशावर स्पष्टीकरण

MPSC Students Protest : पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश ! ओंकारेश्वर मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा,राजकीय नेतेही सहभागी

Marathi News Live Updates : सरकार जाणूनबुजून हलगर्जीपणा करत आहे : मनोज जरांगे पाटील

Vivoचा मोठा धमाका! Vivo Y31t 5G ची किंमत झाली फक्त 24,695; Flipkart वर खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी...

गर्दीत बसमध्ये चढताना धक्का लागून पडली, एसटीच्या चाकाखाली चिरडून १७ वर्षीय तरुणीचा मृत्यू; आईच्या डोळ्यादेखत घटना

SCROLL FOR NEXT