Coffee With Sakal
Coffee With Sakal sakal
सोलापूर

Coffee With Sakal : शाळेसोबत गुरुकुल पद्धतीने मूल्यशिक्षणाचे धडे महत्त्वाचे

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर - विद्यमान शिक्षणाच्या सोबतच मूल्य शिक्षणाची जोड असणारी प्राचीन गुरुकुल शिक्षण पध्दतीचा आविष्कार वारकरी शिक्षण संस्थांच्या माध्यमातून होत आहे. सध्याच्या नैतिक अधःपतनाच्या काळात ही गुरुकुल पद्धती उद्याचा नीतिमान नागरिक घडविण्यास उपयुक्त ठरणार आहे असे मत वारकरी शिक्षण संस्था संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

संघटनेचे अध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जोगदंड, उपाध्यक्ष प्रभाकर महाराज वाघचवरे, सचिव रामेश्वर महाराज जाधव, सुवर्ण कृषी प्रकल्पाचे प्रमुख नानासाहेब कदम, औदुंबर चापसे, माऊली महाराज पवार यांची यावेळी उपस्थिती होती.

गुरुकुल शिक्षण पध्दतीचे पुनर्जीवन

भारतीय संस्कृतीमध्ये गुरुकुल शिक्षण पद्धती ही अत्यंत महत्त्वाची होती. ही पद्धती आक्रमकांनी मोडल्याने समाजात ज्ञानाचा झरा आटु लागला. नवशिक्षणाने नीतिमान माणूस घडत नसल्याचे परिणाम समाजात दिसून येत आहेत. कुटुंबाच्या समस्या, आईवडिलांची सेवा, नीतिभ्रष्ट आचरण, गुन्हेगारी अशा अनेक समस्या वाढीस लागल्या आहेत. त्यावर उपाय म्हणून वारकरी शिक्षण पद्धतीने पुन्हा एकदा गुरुकुल शिक्षण पध्दतीचा वापर करण्याचे काम सुरू केले आहे.

शालेय शिक्षणाची काळजी

गुरुकुल पद्धतीने शिक्षण देत असताना विद्यार्थ्यांची शाळा तर नियमित तर होते. त्यासोबत त्याचा शाळेचा अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ दिला जातो. त्यामुळे या संस्थांमधून शिकणारे विद्यार्थी शालेय शिक्षणात यश मिळवून डॉक्टर, इंजिनिअर आदी अनेक पदांना गवसणी घालत असल्याचे दिसून येते.

पंढरपुरात वारकरी अध्यासन केंद्र

पंढरपुरात कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात वारकरी संप्रदायाचे अध्यासन केंद्र संत तुकाराम महाराजांचे वंशज देहूकर महाराज यांच्या पुढाकाराने सुरु झाले आहे. संत चरित्रे, वारी, ज्ञानेश्वरी, गाथा, अभंग संग्रह आदी साहित्य अभ्यासकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. त्यामुळे वारकरी शिक्षण संस्थांना हे एक संदर्भ केंद्र बनले आहे.

संस्थांना शासनाचे पाठबळ हवे

वारकरी शिक्षण संस्थाचालक संघटना चंद्रभागा नदी ही गंगेप्रमाणे स्वच्छ असावी व तिचे पावित्र्य जपले जावे यासाठी शासनासमोर भूमिका मांडत आहेत. त्यासाठी नमामी चंद्रभागा प्रकल्प पूर्ण व्हावा. वारकरी शिक्षण संस्थांनी सकाळच्या वतीने आयोजित स्वच्छता अभियानात देखील सहभाग घेतला आहे.

या संस्थाकडून शासनाकडे इतर शाळाप्रमाणे पोषण आहार, अनुदानासह चांगला राजाश्रय या संस्थांना लाभावा असा प्रयत्न आहे. सध्या राज्यात १ हजार वारकरी शिक्षण संस्था व सोलापूर जिल्ह्यात २४ संस्था कार्यरत आहेत.

दिनचर्येतून मूल्यशिक्षण

या संस्थामध्ये विद्यार्थ्यांची असलेली दिनचर्या ही नैतिक संस्कार, आरोग्य व संगीताला प्रोत्साहन देणारी आहे. सकाळी योग व व्यायाम केले जातात. त्यानंतर गीता, ज्ञानेश्वरी व गाथा वाचन व पाठांतर केले जाते. त्यासोबत संगीताच्या एका प्रकारात विद्यार्थी निपुण व्हावा या पद्धतीने त्यास शिक्षण व सराव दिला जातो. तसेच स्वावलंबनाची शिस्त देखील मुलांना लागते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Boycott Exit Polls: मतदानोत्तर चाचणीच्या चर्चांवर काँग्रेसचा बहिष्कार; काँग्रेसनं का घेतला असा निर्णय?

Exit Polls 2024: एक्झिट पोल्स महत्वाचे आहेत का? 'या' कारणांमुळं चुकू शकतो अंदाज

IND vs BAN Playing 11 : सराव सामन्यातच ठरणार सलामी जोडी; बुमराहचा पार्टनर कोण असणार?

Virat Kohli : सेमी फायनल, फायनल आली की विराट.... मांजरेकर म्हणतात किंग कोहली टीम इंडियासाठी चिंतेचा विषय

Latest Marathi Live News Update: जीडीपीची आकडेवारी पाहून मोदींनी मानले कष्टकऱ्यांचे आभार

SCROLL FOR NEXT