Love Marriage to Cybercrime 
सोलापूर

औरंगाबादनंतर सोलापुरात घडला प्रकार! 63 वेळा ट्रान्झेक्‍शन

तात्या लांडगे

कोरोना काळात सायबर गुन्हेगारी वाढली असून चोरट्यांनी नवी शक्‍कल लढविल्याचे अनेक गुन्ह्यांमधून स्पष्ट झाले आहे.

सोलापूर : येथील न्यू पाच्छा पेठेतील एसबीआय बॅंकेच्या औद्योगिक शाखेतून चोरट्याने कोणत्याही कार्डचा वापर न करता, एटीएम सेंटरवर न जाता सहा लाख 30 हजारांची रोकड लंपास केली आहे. त्यासाठी समोरील व्यक्‍तीने (कार्ड क्र. 4013472300473988) तब्बल 63 वेळा ट्रान्झेक्‍शन करून शुक्रवारी (ता. 11) रक्‍कम काढली आहे. 10 जूनला असाच प्रकार औरंगाबाद शहरात घडला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. (cybercrime has increased in the corona period)

कोरोना काळात सायबर गुन्हेगारी वाढली असून चोरट्यांनी नवी शक्‍कल लढविल्याचे अनेक गुन्ह्यांमधून स्पष्ट झाले आहे. एसबीआय बॅंकेच्या औरंगाबाद शहरातील एका शाखेत 'ओकी' कंपनीची मशिन होती. त्या शाखेतूनही चोरट्याने अशी रक्‍कम काढल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. संशयित चोरट्याच्या बॅंक खात्याची पोलिसांनी माहिती काढली आहे. आता त्याचे नाव शोधून लोकेशनचा तपास सुरू आहे.

दरम्यान, सोलापुरातील एसबीआय बॅंकेच्या कॅश डिपॉझिट मशिनमधून पैसे काढताना चोरट्याने तब्बल 63 वेळा प्रयत्न केले. प्रत्येकवेळी दहा हजारांप्रमाणे सहा लाख 30 हजारांची रोकड अडीच तासात काढून घेतली. पैसे काढल्यानंतर तो थोडावेळ बाहेर यायचा, त्यानंतर पुन्हा पैसे काढायला जायचा. बॅंकेच्या त्या शाखेत कोणी दुसरा ग्राहक आल्यानंतर तो पुन्हा बाहेर यायचा, असे सीसीटिव्ही फुटेजमधून समोर आले आहे. त्या फुटेजचा आधार घेऊन चोरट्याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

चोरट्याने सकाळी आठ ते साडेदहा या अडीच तासांत 63 वेळा ट्रान्झेक्‍शन करून ही रक्‍कम काढली आहे. 'ओकी' कंपनीच्या कॅश डिपॉझिट मशिनमधून असाच प्रकार गुरूवारी (ता. 10) घडला होता. संशयित तरूण सीसीटिव्ही फुटेजमध्ये कैद झाला असून त्याचा शोध सुरू आहे.

- हणुमंतराव बादुले, पोलिस उपनिरीक्षक, जेलरोड पोलिस ठाणे, सोलापूर

तपासात 'सायबर' करणार मदत

न्यु पाच्छा पेठ परिसरात स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या बॅंकेच्या S5BI003145621 या कॅश डिपॉझिट मशिनमधून बॅंकेच्याच खात्यातून चोरट्याने ही रक्‍कम काढली. मशिनचा इलेक्‍ट्रिक पासवर्डचा सॉप्टवेअर किंवा हार्डवेअरच्या वैशिष्ट्याचा व ओळखदर्शक गोष्टीचा वापर करून मशिनच्या सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअरमध्ये प्रवेश करून ही रक्‍कम काढल्याची फिर्याद बॅंकेचे शाखाधिकारी काशिनाथ बिराजदार यांनी जेलरोड पोलिसांत दिली आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी सायबर क्राईम शाखेची मदत घेतली जाईल, असेही तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. (cybercrime has increased in the corona period)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT