esakal | दिलासादायक! सोलापूर जिल्ह्यातील दीड लाख रुग्णांनी कोरोनाला हरविले
sakal

बोलून बातमी शोधा

corona stop

सोलापूर जिल्हाभरातील तब्बल एक लाख 50 हजार 492 रुग्णांनी कोरोनाला हरविले आहे.

दिलासादायक! सोलापूर जिल्ह्यातील दीड लाख रुग्णांनी कोरोनाला हरविले

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : शहर-जिल्ह्यातील आतापर्यंत एकूण 94 हजार 913 पुरूषांना तर 62 हजार 729 महिलांना कोरोनाची (Corona) बाधा झाली आहे. त्यापैकी चार हजार 265 जणांचा मृत्यू (Died) झाला असून सद्यस्थितीत दोन हजार 885 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दुसरीकडे दिलासादायक बाब म्हणजे, जिल्हाभरातील तब्बल एक लाख 50 हजार 492 रुग्णांनी कोरोनाला हरविले आहे. (One and a half lakh patients in Solapur district have been cured from corona)

हेही वाचा: रूग्ण घटल्याने 22 हजार बेड शिल्लक!  'म्युकरमायकोसिस'चा प्रादुर्भाव नियंत्रणात

पोलिस, आरोग्य व शिक्षण विभागाने मोलाची कामगिरी केल्याने शहरातील रुग्णसंख्या आटोक्‍यात आली. रविवारी सर्वात कमी रुग्णसंख्येची नोंद झाली असून केवळ सहा रुग्ण आढळले आहेत. एकूण 26 प्रभागांपैकी दोन, सात, दहा, 24 व 25 प्रभाग वगळता उर्वरित सर्वच प्रभागांमध्ये एकही रुग्ण सापडला नाही. रविवारी दोन हजार 435 संशयितांची टेस्ट करण्यात आली. दुसरीकडे ग्रामीण भागाची चिंता कायम असून रविवारी 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आठ हजार 539 संशयितांमध्ये 379 रुग्ण वाढले आहेत.

हेही वाचा: महेश कोठेंचा मंगळवारी राष्ट्रवादीत प्रवेश?

अक्‍कलकोट, माळशिरस तालुक्‍यात प्रत्येकी तीन, मोहोळ, सांगोल्यातील प्रत्येकी चौघांचा आणि बार्शीत दोन तर माढ्यातील एकाचा कोरोनाने बळी घेतला आहे. पंढरपूर, माळशिरस, अक्‍कलकोट, मोहोळ या तालुक्‍यात मागील काही दिवसांत मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक राहिले आहे. मृत्यूच्या कारणांचा शोध घेतल्याचा डांगोरा पिटणाऱ्या जिल्हा प्रशासनाला प्रत्यक्षात मात्र, मृत्यू रोखता आलेले नाहीत. रविवारी माळशिरस तालुक्‍यातील बागेचीवाडी येथील 39 वर्षीय महिलेचा तर संगोल्यातील अनकढाळ येथील 46 वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

कोरोनाची सद्यस्थिती

एकूण टेस्ट- 16,27,987

एकूण पॉझिटिव्ह- 1,57,372

आतापर्यंत मृत्यू- 4,265

कोरोनामुक्‍त रुग्ण- 1,50,492

हेही वाचा: सप्टेंबरमध्येच संयुक्‍त पूर्व परीक्षा! मुंबईतील पावसानंतर आयोगाची सावध भूमिका

म्युकरमायकोसिसचे वाढले 21 रुग्ण

कोरोनातून बरे झालेल्या मधुमेह रुग्णांसाठी म्युकरमायकोसिस धोकादायक ठरू लागला आहे. आतापर्यंत या आजाराचे शहर-जिल्ह्यात 440 रुग्ण आढळले असून त्यातील 35 जणांचा मृत्यू झाला आहे. चिंतेची बाब म्हणजे मागील दोन दिवसांत एकही रुग्ण आढळला नसतानाच रविवारी एकदम 21 रुग्ण वाढल्याची नोंद जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे झाली आहे. सध्या एकूण रुग्णांपैकी 222 रुग्ण बरे झाले असून सध्या 32 रुग्णालयात 183 रुग्ण उपचार घेत आहेत. (One and a half lakh patients in Solapur district have been cured from corona)

loading image
go to top