Devotees Escape with Minor Injuries After Building Part Collapses in Pandharpur Sakal
सोलापूर

Solapur News: 'पंढरपुरात जुन्या इमारतीचा भाग कोसळला'; ऐन आषाढी एकादशीदिवशी घटना, दोन भाविक किरकोळ जखमी

Building Collapse Scare in Pandharpur During Ashadhi Wari : दरम्यान, पंढरपूर शहरातील धोकादायक इमारतीचा मुद्दा या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. धोकादायक इमारतीवर कारवाई करून संभाव्य धोका टाळावा, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर : आषाढी एकादशीच्या दिवशी रविवारी (ता. ६) भरवस्तीत असलेली एक धोकादायक इमारतीचा काही भाग कोसळल्याची मोठी घटना घडली. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दोन भाविक मात्र किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान, पंढरपूर शहरातील धोकादायक इमारतीचा मुद्दा या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. धोकादायक इमारतीवर कारवाई करून संभाव्य धोका टाळावा, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

येथील स्टेशन रस्त्यावर एक जुनी दुमजली इमारत आहे. ही इमारत धोकादायक झाली आहे. धोकादायक इमारत काढून घेण्याची सूचना नगरपालिकेने केली होती. तरीपण संबंधितांनी इमारती काढून घेतली नाही. दरम्यान, आज दुपारी या इमारतीचा काही भाग अचानक कोसळला. इमारतीच्या खाली असलेल्या दोन भाविकांच्या अंगावर विटा व माती पडली. यामध्ये ते किरकोळ जखमी झाले आहेत.

या धोकादायक इमारतीच्या शेजारील अनेक इमारतीमध्ये भाविक वास्तव्यास आहेत. अशा वेळी ही धोकादायक इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर प्रशासनाने तातडीने शेजारील एक इमारतीतील लोकांना बाहेर काढून ती खाली केल्याचे प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Bandh 2025 : भारत बंद आज, २५ कोटी कर्मचारी संपावर; जाणून घ्या काय सुरु अन् काय बंद राहणार?

Murder Case: 'अनैतिक संबंधातून शिवथरमधील विवाहितेचा खून'; पुण्यातून एकास अटक, पुजाचा पळून जाण्यास नकार अन्..

मोठी बातमी! स्टेट बोर्डाच्या इंग्रजी माध्यमाच्या ‘इतक्या’ शाळांमध्ये पूर्वीपासूनच हिंदी भाषा; ‘SCERT’च्या नव्या परिपत्रकामुळे मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये यंदा दोनच भाषा

अंगणवाडी सेविकांचा एल्गार! सेवानिवृत्तीनंतर सेविकांना अवघे एक लाख रुपये, मदतनिसांना मिळतात केवळ 75000 रुपये; पेन्शन नाही अन्‌ कामाच्या तुलनेत मानधनही अपुरे

आजचे राशिभविष्य - 9 जुलै 2025

SCROLL FOR NEXT