Gold
Gold esakal
सोलापूर

Gold : खेळ सोन्याचा, भीती दगाफटक्याची

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर - जगातील अस्थिरतेसोबत जागतिक अर्थव्यवहाराचे प्रतीक असलेले सोन्याचे भाव कमी होण्याच्या ऐवजी वाढण्याची शक्यताच अधिक होऊ लागली आहे. सोन्याचे भाव ९० हजाराचा आकडा काही दिवसात गाठेल असा अंदाज समोर येऊ लागला आहे. दोन तासातील भावाच्या बदलाला आता आंतरराष्ट्रीय सट्ट्याचा वास येऊ लागला आहे. या स्थितीत आता सोन्याच्या खेळात कोणीही हात पोळवून घेऊ नयेत अशी सुरक्षित भूमिका मांडली जाऊ लागली आहे.

सोन्याच्या भावाने मागील काही दिवसात कहर केला आहे. इराण व इराकच्या संबंधातील स्थिती युद्धजन्य होईल ही एक शक्यता वाढली आहे. त्यासोबत इतर अनेक कारणाचा ऊहापोह होऊ लागला आहे.

मात्र शुक्रवारी (ता. १२) सायंकाळी ६, रात्री आठ व रात्री ९ वाजता अचानक सोन्याच्या भावाने चक्क ७४ हजाराची उसळी घेतली. या प्रकाराने सोन्याचे व्यापारी देखील अचंबित झाले. हा प्रकार म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात सट्टेबहाद्दर व बिग बुल्सनी खेळलेला मोठा खेळच होता याचा अंदाज व्यापाऱ्यांना आला. या प्रकारानंतर गुंतवणुकीत फायदा होईल या आशेवर असलेल्या गुंतवणूकदारांनी बॅकफुटवर जाणे पसंत केले. त्यानंतर आज चोवीस तासात सोन्याचे भाव पुन्हा एक हजार रुपयांनी कमी झाले.

अचानक भावबदलाप्रमाणे दीर्घकाळ भाव वाढते राहण्याचा अंदाज देखील समोर येऊ लागला आहे. युद्धजन्य स्थितीसोबत चीनच्या राष्ट्रीय बॅंकेकडून परिस्थिती हाताळण्यासाठी झालेली वाढलेली सोने खरेदी हे एक कारण बनले आहे. आता गोल्ड मन सारख्या संकेतस्थळाने सोन्याचे भाव ८५ हजार रुपयांपर्यंत वाढण्याच अंदाज व्यक्त केला आहे.

ग्राहकांनी काय करावे

  • सध्याच्या स्थितीत सोने मोडणे किंवा खरेदी करण्याचे निर्णय चुकू शकतात हे गृहीत धरावे

  • सोने मोडण्याच्या आग्रहाला बळी पडू नये

  • वजनाऐवजी आपल्या बजेटनुसारच सोन्याची खरेदी करावी.

  • गुंतवणूकदारांनी सावधानतेने काम करण्याची गरज

  • ग्राहकांनी काही दिवसासाठी सोने खरेदी लांबवली तर योग्यच

सोन्याचे भाव वाढतेच राहणार आहेत असा अंदाज आहे. सोन्याचे भाव ९० हजार रुपयापर्यंत जाऊ शकतात असे मानले जाते. इराण-ईराकचे मतभेद, चीनच्या राष्ट्रीय बॅंकेची वाढती सोने खरेदी, अमेरिकेत व्याज दर न वाढणे ही कारणे सोने बाजाराला प्रभावित करणारी आहेत.

- विशाल वर्मा, सोने व्यापारी, सोलापूर

एक दोन तासाच्या फरकाने झालेले सोने भावातील बदल आश्चर्यकारकच मानले पाहिजेत. या स्थितीत सोन्याच्या खरेदीत हात पोळण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय स्थितीत काही चांगले बदल होईपर्यंत वाट पाहिली तर सोन्याचे स्थिर भाव पुढे पाहण्यास मिळतील.

- मिलिंद वेणगूरकर, गणेश रामचंद्र आपटे ज्वेलर्स, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

Bhagwan Pawar: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई! काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

Pune Traffic News: गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीत एक जूनपासून बदल, वाचा महत्वाची बातमी

Railway News: नागरिकांच्या प्रवासावर ब्लॉक नको; मेगा ब्लॉकवर मनसे आमदार राजू पाटील यांचे ट्विट

SCROLL FOR NEXT