सोलापूर

सक्सेस स्टोरी ः लॉक डाऊनच्या काळात शेतकऱ्यांनी दिली घरपोच सेवा

संतोष सिरसट

सोलापूर : लॉकडाऊनच्या काळात काही शेतकऱ्यांनी सोशल मीडियाचा पुरेपूर वापर चांगल्या कामासाठी करून घेतला आहे. या काळात काही शेतकऱ्यांनी द्राक्ष, आंबा, भाजीपाला शहरातील लोकांना घरपोच करून चांगले उत्पन्न मिळविले आहे. पाच लाखाची द्राक्षे आणि पाच लाखाचा आंबा सोशल मीडियाच्या माध्यमातून विकण्यात शेतकऱ्यांना यश आले आहे. 

लॉक डाऊनच्या काळात शेतातील माल बाजारपेठेमध्ये नेऊन विकणे शेतकऱ्यांना शक्य नव्हते. त्यामुळे उपलब्ध साधनांचा वापर करण्यावर काही शेतकऱ्यांनी भर दिला. त्याचा चांगलाच फायदा त्यांना झाल्याचे स्पष्ट होते. शेतकऱ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याकडे असलेल्या द्राक्ष, आंबा, भाजीपाला या पिका बाबत माहिती लोकांना देऊन त्या माध्यमातून शहरातील लोकांना घरपोच सेवा देण्याचे काम केले. घरपोच सेवा दिल्याने शेतकऱ्यांनाही चार पैसे ज्यादा चे मिळाले. महाराष्ट्र

सोलापूर शहरातील काही सोसायट्यांमध्ये व अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या लोकांनी सोशल मीडिया वरून आलेल्या या माहितीचा पुरेपूर उपयोग करून घेत आपल्या सोसायटीमध्ये, अपार्टमेंटमध्ये संबंधित शेतकरी माल कशा पद्धतीने घेऊन येईल याची पुरेपूर काळजी घेतली. त्यामध्ये सोनी सिटी मधील रहिवासी असलेले भारत जाधव यांनी पुढाकार घेतला. त्‍यांच्‍या सोसायटी शिवाय इतर सोसायट्यांनामध्येही शेतकर्‍यांचा भाजीपाला थेटपणे पोहोचवण्याचे काम जाधव यांच्या माध्यमातून करण्यात आले. 


माझ्याकडे केशर या आंब्याच्या जातीची तीन एकर क्षेत्रावर बाग आहे. आलेल्या परिस्थितीचा सामना करत व सोशल मीडियाचा वापर करत आंब्याची विक्री केली. दोनशे रुपये किलोने आंबा घरपोच देण्याचे काम केले. आतापर्यंत जवळपास अडीच टन आंबा अशा पद्धतीने विकून त्यातून पाच लाख रुपये मिळविले आहेत.
रामलिंग फसके, शेतकरी. 


माझ्या शेतामध्ये वांगी, टोमॅटो, जवारी, कांदा, दोडका, कोथिंबीर, मेथी, शेपू अशाप्रकारे सर्व प्रकारचा भाजीपाला आहे. तो भाजीपाला या काळामध्ये मी शहरातील सोसायट्यांमध्ये व आपार्टमेंट मध्ये नेऊन विकला. त्यातून मला चांगला फायदा झाला. शहरवासीयांना वाजवी दरामध्ये भाजीपाला उपलब्ध करून दिल्याचे मला समाधान वाटते. 
महेश पवार, शेतकरी. 

माझ्याकडे तीन चार एकर द्राक्षाची बाग आहे. 80 रुपयांनी दहा टन द्राक्ष मी निर्यात केली. पण लॉक डाउन सुरू झाल्यामुळे उरलेली द्राक्ष मागण्यासाठी व्यापारी शेतात येत नव्हते. शेवटी सोशल मीडियाचा वापर करून साडे तीनशे रुपयांना आठ किलो ची पेटी याप्रमाणे द्राक्षांची विक्री केली व त्यातून जवळपास पाच लाख रुपये मला मिळाले. शहरातील लोकांना द्राक्ष घरपोच देण्याचे काम मी केले. 
विलास पवार, शेतकरी. 

लॉकडाऊन च्या काळात थेट शेतकऱ्यांना त्यांचा माल विक्रीसाठी मदत करता आली. याचा खूप आनंद आहे. सोसायटीमध्येच सगळ्या वस्तु ऊपलब्ध करुन देता आल्या. असा हा आमचा आगळावेगळा सोनी सिटी पॅटर्न इतर सोसायट्यांनी राबवावा. लोकांनी घराबाहेर पडु नये.
भारत जाधव, रहिवासी, सोनी सिटी. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Crisis: मोजतबा खामेनींना सत्तापालटाची भीती! इराणमध्ये कठोर नियम लागू; अमेरिका-इस्त्रायलवर गंभीर आरोप

IND vs AFG: टीम इंडियाला सर्वात मोठा धक्का! विराट कोहली मालिकेबाहेर? 'हा' खेळाडू घेणार जागा!

संजू राठोडच्या 'गुलाबी साडी' गाण्यासाठी अभिनेत्रीला किती पैसे मिळाले? प्राजक्ता म्हणाली, 'चांगला मित्र म्हणून त्याने...'

NEET 2026 री-एग्झामचा सुद्धा पेपर झाला लीक? टेलिग्रामवरील दाव्यांची NTA कडून सायबर क्राइमकडे चौकशी

Nagpur News : पुन्हा ‘नीट’ परीक्षा देण्याची हिम्मत नाही; विद्यार्थिनीने गळफास घेऊन संपविले जीवन, सुसाइड नोटमुळे खळबळ

SCROLL FOR NEXT