सोलापूर

'MPSC'ची तयारी करणाऱ्या बहिणीमुळे भाऊ सैन्यात भरती

तात्या लांडगे

बहिणीची तयारी पाहून भाऊ गोंविदनेही सरकारी नोकरीचे स्वप्न पाहिले. बहिणीच्या प्रेरणेतून, मार्गदर्शनातून गोविंद हा (बॉर्डर सेक्‍युरिटी फोर्स) देशसेवेसाठी सैन्यात भरती झाला.

सोलापूर: कुटुंबाची परिस्थिती बेताची, पाच एकर जमीन, दोन बहिणी आणि एक भाऊ असा मोठा परिवार. लग्नाला आलेल्या बहिणीची चिंता, शेती असूनही पुरेसे पाणी नाही. अशा परिस्थितीत भाग्यश्री जाधव यांनी अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले आणि 'एमपीएससी'ची तयारी सुरू केली. बहिणीची तयारी पाहून भाऊ गोंविदनेही सरकारी नोकरीचे स्वप्न पाहिले. बहिणीच्या प्रेरणेतून, मार्गदर्शनातून गोविंद हा (बॉर्डर सेक्‍युरिटी फोर्स) देशसेवेसाठी सैन्यात भरती झाला. त्याचवेळी भाग्यश्रीनेही आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून पोलिस उपनिरीक्षक होण्याचा मान मिळविला.

औसा (जि. लातूर) येथील भाग्यश्री जाधव यांचे कुटुंब. घरातील कोणीच नोकरी नसलेले या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताचीच. कुटुंबाची परिस्थिती सुधारण्याचे स्वप्न मनाशी बाळगून भाग्यश्रीने पदवीच्या शिक्षणानंतर 'एमपीएससी'ची तयारी सुरू केली. 2015 मध्ये भाग्यश्रीने आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. परंतु, लहान भावालाही त्यांनी सोबत घेतले आणि नोकरीचे स्वप्न दाखविले.

बहीण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होण्यापूर्वीच 12 वी शिक्षणावरून गोविंद सैन्यात दाखल झाला. राजस्थानमध्ये काही वर्षांची नोकरी करून मागील अडीच-तीन वर्षांपासून तो आता जम्मूमध्ये कार्यरत आहे. दरवर्षी रक्षाबंधनाला गोविंद घरी येतो. मात्र, मागील दोन वर्षांत तो आला नाही. त्यामुळे जेव्हा-जेव्हा तो राखीपौर्णिमेला येत नाही, तेव्हा बहीण भाग्यश्री त्याला पोस्टाने राखी पाठविते. देशसेवा करण्याचे बळ मिळू दे, शत्रूंशी लढण्याची ताकद, जिद्द कायम राहू दे, अशी प्रार्थना भाग्यश्री करते.

ठळक बाबी...

- भाऊ गोंविदसह देशसेवेसाठी सैन्य दलात दाखल झालेल्या त्याच्या कडील सर्वांनाच भाग्यश्री पाठविते राखी.

- स्वत: 'एमपीएससी'ची तयारी करतानाच बहिणीने भाऊ गोंविदला दाखविले देशसेवेचे स्वप्न

- बहिणीच्या प्रेरणेतून गोविंदने स्वीकारली देशसेवा; सात वर्षांपासून जम्मूमध्ये आहे कार्यरत

- बहिणीने भावाला नोकरी लागण्यास केली मदत; स्वत:ही पोलिस सेवेत रुजू

- भाऊ-बहिणीमुळे बदलली कुटुंबाची परिस्थिती; गोविंद राखीपौर्णिमेला बहिणीच्या राखीची वाट पाहतो.

मी 'एमपीएससी'ची तयारी करत असतानाच भावालाही देशसेवेत जाण्याची इच्छा झाली. त्याला मदत केली आणि तो सैन्यात दाखल झाला. त्यानंतर 2015 मध्ये मलाही यश मिळाले आणि मी एमपीएससी उत्तीर्ण होऊन 'पीएसआय' झाले. त्याच्यासाठी पोस्टाने दरवर्षी राखी पाठवते.

- भाग्यश्री जाधव, पोलिस उपनिरीक्षक, शहर वाहतूक शाखा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT