karmala narayan patil join sharad pawar group ncp politics
karmala narayan patil join sharad pawar group ncp politics Sakal
सोलापूर

Narayan Patil : नारायण पाटलांचा आज राष्ट्रवादी पवार गटात प्रवेश

सकाळ वृत्तसेवा

करमाळा : करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील हे शुक्रवारी (ता. २६) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. नारायण पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत कार्यरत होते. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

नारायण पाटील यांच्या समवेत करमाळा पंचायत समितीचे माजी सभापती, पंचायत समितीचे माजी सदस्य, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य यांच्यासह सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत नारायण पाटील यांचा प्रवेश होणार आहे. सकाळी १० वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, माढा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर १९९९ ला नारायण पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून करमाळा विधानसभा मतदारसंघातून उभे होते. २००९ साली त्यांनी जनसुराज्य पक्षाकडून निवडणूक लढवली होती.

तर २०१४ ला शिवसेनेकडून निवडणूक लढवत ते आमदार झाले. माजी आमदार नारायण पाटील हे करमाळा तालुक्यातील वजनदार नेते आहेत. २०१९ ला शिवसेनेने उमेदवारी आयत्या वेळी कट केलो. त्यांनी अपक्ष निवडणूक लढवूनही मोठे मताधिक्य मिळाले होते.

शिवसेनेने उमेदवारी नाकारली तरीदेखील ते शिवसेनेतच होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर मात्र त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. मात्र आता लोकसभेच्या रणधुमाळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election : प्रचाराचे वादळ थंडावले ; सातव्या टप्प्यासाठी उद्या मतदान

Kalyani Nagar Accident :भ्रष्ट चेल्यांनी बदलले तिघांचे रक्तनमुने ; ‘ससून’मधील डॉक्टरांची बनवाबनवी

Pune Accident : पुण्यात पुन्हा रॅश ड्रायव्हिंग ; बीआरटी मार्गात घुसवली मोटार

World No Tobacco Day 2024 : हृदय-फुफ्फुसांपासून ते कर्करोगापर्यंत, धूम्रपानामुळे ‘या’ गंभीर आजारांना मिळतेय आमंत्रण

World No Tobacco Day 2024: ‘तंबाखू’वर मात शक्य! हवा फक्त दृढनिश्चय; ‘आरोग्य’ विभागाकडून 2 वर्षात दीड लाखावर समुपदेशन

SCROLL FOR NEXT