mahavitaran 
सोलापूर

महावितरण : तक्रार निवारणासाठी आता वेबिनार 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या लॉकडाउन सुरू असल्याने विविध तक्रार निवारणासाठी महावितरणच्या सर्व ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी वेबिनार किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचे आयोजन करण्यात येणार आहे. पुणे प्रादेशिक विभागात त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत व प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिले आहेत. 

ग्राहकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद 
कोरोना विषाणूमुळे राज्यात लॉकडाउन सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर सर्व वर्गवारीतील ग्राहकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे थेट संवाद साधून वीजपुरवठा, वीजबिल, वीजयंत्रणेची दुरुस्ती आदींबाबत गाऱ्हाणी, प्रश्‍न, अपेक्षा व अडचणी जाणून घेऊन त्याचे निराकरण करण्याचे तसेच ग्राहकांना महावितरणच्या विविध सेवांची माहिती उपलब्ध करून देण्यासही सांगितले आहे. या अनुषंगाने पुणे प्रादेशिक संचालक नाळे यांनी मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंता यांना विभाग व उपविभागस्तरावर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचे आयोजन करावे आणि वीजग्राहकांशी संवाद साधून त्यांच्या विविध तक्रारींचे निवारण करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच श्री. नाळे स्वतः पुणे, सोलापूर, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील औद्योगिक व अतिमहत्त्वाच्या ग्राहकांशी संवाद साधणार आहेत. 

घेतला कामांचा आढावा 
वीजग्राहकांसाठी संबंधित मंडलचे अधीक्षक अभियंता हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचे आयोजन करणार आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या आयोजनाची तारीख व वेळेची पूर्वमाहिती संबंधित स्थानिक कार्यालयाकडून वीजग्राहकांना कळविण्यात येणार आहे. 
याआधी श्री. नाळे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महावितरणचे सुमारे एक हजार 800 अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांशी तसेच रीडिंग व बिल वाटप एजन्सी, विविध योजनांमधील कंत्राटदार आदींशी थेट संवाद साधून कामांचा आढावा घेतला आहे. यासोबतच पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सचिन तालेवार व गणेशखिंड मंडलचे अधीक्षक अभियंता पंकज तगलपल्लेवार यांनी 180 सोसायट्यांच्या फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांशी स्थानिक अभियंत्यांसमवेत नुकताच वेबिनारद्वारे संवाद साधला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wani Crime : मायेने घरात ठेवले, घासातला घास दिला; त्याच भाडेकरूने जीव घेतला...!

Roasted Poha Namkeen: डाएट करताय? मग नक्की ट्राय करा कमी तेलातले 'रोस्टेड पोहा नमकीन'; वजन कमी करण्याच्या प्रयत्नात ठरेल फायदेशीर!

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

SCROLL FOR NEXT