Accident on Pune Solapur Highway  esakal
सोलापूर

पुणे-सोलापूर महामार्गावर 40 प्रवासी घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात; ट्रकच्या धडकेत एक ठार, 4 जण गंभीर जखमी

बसमध्ये ३५ ते ४० प्रवासी प्रवास करीत होते. प्रवासी झोपेत असल्याने जोरदार धक्क्यामुळे अनेक प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

पहाटे झालेल्या या अपघातामुळे महामार्गावर जवळपास चार किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

मोडनिंब : पुणे-सोलापूर महामार्गावरील (Pune Solapur Highway) खंडाळी इथं लक्झरी बस व ट्रकच्या झालेल्या अपघातात (Bus-Truck Accident) एक प्रवासी ठार, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. आज (ता. १३) पहाटे अडीचच्या सुमारास हा अपघात घडला. पुण्याहून सोलापूरकडे जाणाऱ्या एमएच १२ एसपी ५२७२ या मालवाहतूक ट्रकला मुंबईहून हैदराबादकडे जाणाऱ्या एमपी ०९ डीएल ८०९१ या खासगी लक्झरी बसने पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये खासगी बसच्या केबिनचा चक्काचूर झाला.

बसमध्ये ३५ ते ४० प्रवासी प्रवास करीत होते. प्रवासी झोपेत असल्याने जोरदार धक्क्यामुळे अनेक प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातातील मृत व जखमींची नावे समजू शकली नाहीत. अपघातस्थळी वरवडे व सावळेश्वर येथील टोलनाक्याच्या महामार्ग गस्ती पथकामधील डॉ. गोरखनाथ लोंढे, इरेश कस्सा, पवन फाटे, रोहित काकडे यांनी रुग्णवाहिकेतून जखमींना सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले.

महामार्ग पोलीस केंद्र मोडनिंब व मोहोळ पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यास मदत केली. पहाटे झालेल्या या अपघातामुळे महामार्गावर जवळपास चार किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाडकी बहीण योजनेचे हप्ते का थांबले? अदिती तटकरेंनी सांगितली ४ मोठी कारणं सांगितली! महत्त्वाची माहिती समोर

बापरे! बॉलिवूड अभिनेत्रीरविना टंडनच्या कुटुंबाला धक्का; दागिने-घड्याळांसह 'इतक्या' रुपयांचा ऐवज लंपास

Latest Marathi News Live Update : उत्तराखंडमधील 'व्हॅली ऑफ फ्लॉवर्स' पर्यटकांसाठी पुन्हा खुली

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे ॲक्शन मोडवर! आता 'या' सेलिब्रिटींवरही कारवाई होणार, एफडीएचं मोठं पाऊल; नेमकं प्रकरण काय?

Kolhapur Bribery Case : बदलीसाठी शिक्षकाकडून २५ हजार घेताना शिक्षण अधिकारीला टपरीवर अटक, कोल्हापुरात लाचलुचपतची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT