Jat-Sangola Road Accident : कामासाठी जाणाऱ्या महिलांच्या जीपला भीषण अपघात; 3 महिला ठार, तर 10 जण जखमी

या अपघातामध्ये महिलांचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Jat-Sangola State Road Accident
Jat-Sangola State Road Accidentesakal
Summary

अथणी तालुक्याचा उत्तर भाग दुष्काळी आहे. यामुळे या भागातील मजूर महाराष्ट्रातील द्राक्ष कामांसाठी जातात.

अथणी : भरधाव मोटारीचा टायर फुटून झालेल्या अपघातात (Road Accident) तीन महिला मजूर ठार झाल्या, तर १० जण जखमी झाल्या. हा अपघात जत-सांगोला राज्य मार्गावर (Jat-Sangola State Road) सोनंद (ता. सांगोला) येथील चव्हाण वस्तीजवळ शनिवारी सकाळी घडला. गीता रवींद्र जोडमणी (वय ३६), महादेवी श्रीशैल चौगुला (वय ४०, दोघीही रा. बाळीगेरी, ता. अथणी) आणि कस्तुरी शंकर तावशी ऊर्फ बिरडी (वय ५०, रा. मलाबाद, ता. अथणी) असे ठार झालेल्या महिलांची (Women) नावे आहेत. मृत महिला द्राक्षबागेत काम करण्यासाठी मोटारीतून जात होत्या.

Jat-Sangola State Road Accident
Pachod Police : 17 वर्षाच्या मुलाकडून 4 वर्षाच्या चिमुरड्यावर अत्याचार; पाचोड पोलिसांत गुन्हा दाखल

तर, गंभीर जखमी झालेल्या उज्वला दोडमणी व कविता चौगुले यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना सांगली येथील सिव्हिलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. मोटारचालक कुमार जगदाळ याच्या डोक्याला गंभीर मार लागला आहे, तर मुतव्वा दोडमणी, सत्यव्वा चौगुले, राजाक्का दोडमणी, अश्विनी दोडमणी, महादेवी दोडमणी, गीता मडीमणी, राजश्री काळ्यागोळ अशी किरकोळ जखमी असलेल्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, अथणी तालुक्याचा उत्तर भाग दुष्काळी आहे. यामुळे या भागातील मजूर महाराष्ट्रातील द्राक्ष कामांसाठी जातात. नेहमीप्रमाणे द्राक्षबागेच्या कामाला कासेगाव (ता. सांगोला) येथे जात होत्या. या मोटारीत एकूण १२ मजूर होते. मजुरांत सर्व महिलाच होत्या. गेल्या अनेक महिन्यांपासून या भागात कामे बंद झाल्याने महाराष्ट्रात हे मजूर जात होते.

Jat-Sangola State Road Accident
शिंदे गटाच्या गुंड प्रवृत्तीच्या जिल्हाध्यक्षाला तातडीनं अटक करा; राजेखान जमादारविरुध्द पत्रकार आक्रमक

राज्य मार्गावर मोटार जात असताना टायर फुटल्याने सकाळी ८.३० वाजता अपघात झाला. मोठा आवाज आल्याने आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली व मदत सुरू केली. तीन महिलांचे मृतदेह वाहनाच्या बाहेर पडले होते. गंभीर व किरकोळ जखमींना लागलीच उपचारासाठी मिरज व सांगलीला पाठविण्यात आले आहे. घटनास्थळी सांगोल्याचे पोलिस उपनिरीक्षक भीमराव खणदाळ यांनी भेट देऊन पंचनामा केला. सांगोला पोलिस ठाण्यामध्ये अपघाताची नोंद झाली आहे.

Jat-Sangola State Road Accident
Yakub Baba Dargah : 'या' भागात शिवरायांचे गुरू म्हणून याकुबबाबा का आहेत प्रसिद्ध? जाणून घ्या घुमट नसलेल्या दर्ग्याची दंतकथा

बाळीगेरी, मलाबादवर शोककळा

महिला मजूर पोटाची खळगी भरण्यासाठी द्राक्षबागेत काम करण्यासाठी दररोज जात. त्यांच्यावर कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालत असल्याने महिला कष्टाची पर्वा न करता महाराष्ट्रात कामासाठी जात होत्या. या अपघातामध्ये महिलांचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बाळीगेरी आणि मलाबाद या गावावर शोककळा पसरली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com