Praniti Shinde on ED  google
सोलापूर

ED जिसकी मम्मी है, यह सरकार.., प्रणिती शिंदेच्या घोषणेनं खळबळ

सोलापुरात आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आक्रमक झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोलापुरात आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आक्रमक झाली आहे.

सध्या राज्यात विविध पक्षातील राजकीय नेत्यांच्या वक्तव्यावरून वातावरण चांगलचं तापलं आहे. काही वादग्रस्त वक्तव्य आणि एकमेकांवर होणार आरोप यामुळे राजकीय वातावरण ढवळलं आहे. दरम्यान, आता सोलापूरमधील काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी केंद्रातील मोदी सरकार विरोधात रस्त्यावर उतरुन जोरदार आंदोलन केलं आहे.

या आंदोलनाच्या निमित्ताने आमदार शिंदे यांनी 'ईडी जिसकी मम्मी है, ओ सरकार निक्कम्मी है', अशी नवी घोषणा दिली आहे. राज्यात ईडीच्या माध्यमातून ज्या कारवाया होत आहेत त्याकडे लक्ष वेधत आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापुरात रस्त्यावर उतरुन ईडीच्या कारवाई विरोधात निषेध केला आहे. या आंदोलनात नव्या घोषणेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

सोलापुरात पार पडलेल्या आंदोलनास्थळी आमदार प्रणिती यांनी, डॉ. मनमोहन सिंग हे देशाचे पंतप्रधान असताना गॅस सिलेंडर केवळ चारशे रुपये होता. त्यावेळी भाजपने त्यांना बांगड्या पाठवल्या होत्या. आता आम्ही यांना काय पाठवायचे? असा प्रश्न उपस्थित करत ईडीच्या कारवाई विरोधात आणि भाजप ईडीचा गैरवापर करत असल्याची टीका त्यांनी केली आहे.

दरम्यान, सोलापुरात आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आक्रमक झाली आहे. वॉर्ड स्तरावर आंदोलनं केली जात असून आंदोलनं करताना नव्या घोषणा, लोकांच्या मनातील असंतोष मांडण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात आहे. त्यावेळी महागाईच्या मुद्द्यावर काँग्रेसचे यूपीए सरकार आणि भाजपचे मोदी सरकार यांच्या भावाढीचा लेखाजोखा मांडला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US student visa: आता अमेरिकेत परदेशी विद्यार्थ्यांच्या 'व्हिसा'ला चार वर्षांची मर्यादा? लाखो भारतीय विद्यार्थ्यांवर होणार परिणाम

IND VS ENG 2ND ODI: विराट कोहली, श्रेयस अय्यरची फिफ्टी, तरीही भारत ४४ षटकांत तंबूत परतला; जोफ्रा आर्चर, गस एटकिन्सनचा कहर

Ganja Seized : अंकोली येथे सापडला 40 किलो गांजा; संशयीताला तीन दिवस पोलीस कोठडी

Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Pune News : महापालिका आयुक्तांना आलेला वादग्रस्त मेसेज फेक? स्थायी समिती अध्यक्षांचा अजब दावा

SCROLL FOR NEXT