ED कारवाईनंतर राऊतांचं जंगी स्वागत; शिवसेनेकडून शक्ती प्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut

ED कारवाईनंतर राऊतांचं जंगी स्वागत; शिवसेनेकडून शक्ती प्रदर्शन

खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईनंतर शिवसेना आणि भाजप यांच्यातील संर्घष आणखी चिघळला आहे. या संघर्षाचे तीव्र पडसाद आज शिवसेनेच्या आंदोलन आणि शक्तीप्रदर्शानद्वारे दिसणार आहेत. एक-दीड आठवड्याच्या प्रतीक्षेनंतर संजय राऊत आता मुंबईत दाखल होत आहेत. त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी शिवसेनेकडून जोरदार तयार करण्यात आली आहे. मुंबई विमानतळापासून ते राऊत यांच्या भांडुप येथील निवासस्थानापर्यंत हे स्वागत केले जाणार आहे. यासाठी शिवसेनेकडून चाळीस बसेस आणि ढोल ताशा पथक अशी जय्यत तयारी करण्यात आली आहे. यावेळी शिवसेनेचे अनेक खासदार, आमदारही उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे.

हेही वाचा: सोमय्यांच्या अडचणीत वाढ, INS विक्रांत प्रकरणी गुन्हा दाखल

दरम्यान, राऊतांच्या स्वागतासाठी शिवसेनेनं जोरदार तयारी केली आहे. ईडीने केलेल्या कारवाईनंतर राऊत यांच्या समर्थनार्थ शिवसैनिक रस्त्यावर उतरणार आहेत. आज मुबंई विमानतळ ते राऊत यांच्या भांडुप येथील निवास स्थानापर्यंत हे शक्ती प्रदर्शन दिसणार आहे. एक ते दीड आठवड्याच्या प्रतीक्षेनंतर संजय राऊत मुंबईत दाखल होणार आहेत त्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह असणार आहे. या स्वागतासाठी विविध विभागातून शिवसैनिक मुंबई विमानतळावर दाखल होणार आहेत. त्यानंतर विमानतळपासून ते संजय राऊत यांच्या निवासस्थानापर्यंत त्यांची जंगी मिरवणूक काढण्यात येणार आहे अशी माहिती मिळत आहे. अनेक विभागात शिवसेनेनं आज दिवसभरात आंदोलनाचे आयोजित केले आहे.

भाजपाचे किरीट सोमय्या आणि ईडी विरोधात हे प्रतिकात्मक आंदोलन असणार आहे. त्यामुळे आज किरीट सोमय्या आणि भाजप यांच्या विरोधात शिवसेना सुद्धा आक्रमकपणे रस्त्यावर उतरताना दिसणार आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर आणि भाजपाकडून सूडबुद्धीने राजकारण केले जात आहे. खोट्या कारवायांमध्ये शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना गोवण्यात येत आहे. याविरोधात मतप्रदर्शन करण्यासाठी हे आंदोलन असणार आहे, अशी माहिती मिळत आहे.

हेही वाचा: 'आधी काका मला वाचवा ऐकू यायचं, आता दिल्लीत...' मनसेचा पवारांना टोला

Web Title: Sanjay Raut Welcome In Mumbai Shivsena After Ed Enquiry

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..