Solapur sakal
सोलापूर

Solapur News: सोलापूर जिल्ह्यात पावणेतीन लाख बेरोजगार, गुरुवारी नॉर्थकोट येथे होणार रोजगार मेळावा

गुरुवारी नॉर्थकोट येथे रोजगार मेळावा; १० ते ३० हजार पगाराच्या नोकरीची संधी

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याअंतर्गत सहाशे पदांची भरती केली जाणार आहे. गुरुवारी (ता. २७) जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी सोलापुरातील नॉर्थकोट मैदानाजवळील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या कार्यालयात हा मेळावा होणार आहे. उमेदवारांनी कागदपत्रांसह सकाळी १० वाजता त्याठिकाणी उपस्थित राहायचे आहे.

किमान दहावी उत्तीर्ण ते पदवीधर उमेदवारांना या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून धाराशिव, बार्शी, उदगीर, निलंगा, पंढरपूर, नाशिक, पुणे, नागपूर, धुळे, कोल्हापूर, पुणे, सोलापूरसह हैदराबाद येथे नोकरीची संधी मिळणार आहे. बेरोजगार तरूणांनी mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर त्यांची नोंदणी करायची आहे. प्रत्येक रोजगार मेळाव्यात त्यांना सहभागी होता येईल.

दरम्यान, रोजगार मेळाव्यात थेट मुलाखतीतून उमेदवारांना रोजगार मिळणार आहे. जिल्ह्यात सध्या एक लाख ८३ हजार ६८९ तरुण तर ७७ हजार ३९४ तरुणांना रोजगार तथा नोकरीची गरज आहे. जिल्ह्यातील एकूण दोन लाख ६१ हजार ८३ सुशिक्षित बेरोजगारांनी नोंदणी केली आहे. त्या सर्वांना रोजगार मिळावा म्हणून आता दरमहा रोजगार मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे. तरूणांनी सुरवातीला जास्त पगार आणि त्याच ठिकाणी काम हवे, असा हट्ट करू नये.

भविष्यात तरुणांना परदेशात नोकरीची संधी

प्रत्येक राज्य सरकार नॅशनल इन्स्ट्यिट्यूट ऑफ करिअर सायन्स (नोएडा) या संस्थेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर नोकरी तथा रोजगार मेळावा आयोजित करण्याचे नियोजन आहे. पण, त्यासाठी बेरोजगार तरूणांनी वाहन चालविण्याचा परवाना, पॅनकार्ड, पासपोर्ट काढून घ्यायला हवा, असे आवाहन सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी केले आहे.

उमेदवारांनी ‘इथे’ करावा संपर्क

अधिक माहितीसाठी ०२१७-२९५०९५६ या क्रमांकावर कॉल करून माहिती घेता येईल. तसेच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नॉर्थकोट, पार्क चौक येथेही उमेदवार भेट देऊन माहिती घेऊ शकतील, असे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी सांगितले. कौशल्य कमी असलेल्या तरुणांना कार्यालयातर्फे तीन ते सहा महिन्यांचे मोफत प्रशिक्षण देखील दिले जाते, असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या वेळेअभावी थांबला महामेळावा

‘शासन आपल्या दारी’अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील बेरोजगार तरुण-तरुणींसाठी रोजगार महामेळावा आयोजित करण्याचे नियोजन झाले आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा मेळावा संपन्न होणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने मुख्यमंत्री कार्यालयास पत्रव्यवहार देखील केला आहे. परंतु, मुख्यमंत्र्यांकडून अद्याप त्यासाठी वेळ मिळाला नसल्याने तो महामेळावा लांबणीवर पडल्याचे सूत्रांनी सांगितले. पाच ते सहा उद्योजक सध्या रोजगार मेळाव्यासाठी तयार देखील आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Attack : मुंबई लोकलमध्ये पुन्हा रक्तरंजित घटना ! धावत्या ट्रेनमध्ये तिघांनी तरुणावर केले सपासप वार

Yavatmal Crime: यवतमाळ हादरले! रागाच्या भरात वडिलांनी केला मुलीचा खून; मृतदेह गोठ्यात लटकवून फाशीचा केला बनाव

Latest Marathi News Live Update : नागपुरात नगरसेवक वसीम खान यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल; काय आहे कारण?

Kashedi Ghat Landslide : महामार्गावरील एक मार्गिका तब्बल 14 तास बंद; धामणदेवी-चोळई येथे दरड कोसळली, रस्ता खुला करण्याच्या कामात पावसाचे विघ्न

Pune News: मोठी घडामोड! यशवंत कारखान्याच्या 99 एकर जमीन व्यवहाराला सरकारची पुन्हा स्थगिती, खरेदीखत पूर्ण, तरीही ब्रेक

SCROLL FOR NEXT