Solapur Accident News : सोलापूर जिल्ह्यात सहा महिन्यांत ३९१ जणांचा अपघातात मृत्यू

सहा महिन्यांत ३९१ जणांचा रस्ते अपघातात मृत्यू; वाढत्या दुर्घटना चिंतेची बाब
Solapur Accident News
Solapur Accident Newssakal

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात रस्त्यांची कनेक्टिव्हिटी वाढल्यानंतर वाहनांचा वेग प्रचंड वाढला आहे. दुसरीकडे वाहनचालक शॉटकटच्या नादात जीव धोक्यात घालत आहेत. हेल्मेटचा वापर केला जात नाही. चिंतेची बाब म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत यंदा जानेवारी ते जून या सहा महिन्यांत ३६६ अपघातात तब्बल ३९१ जणांचा (सरासरी दररोज दोन) मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

रस्ते अपघातात अचानक घरातील कर्ता जग सोडून गेल्यानंतर त्याची नवविवाहित पत्नी, चिमुकली मुले, वयस्क माता-पित्यांचे काय हाल होत असतील, याचा सर्वांनीच विचार करण्याची आवश्यकता आहे.

Solapur Accident News
Solapur News : कर विभागातील फायलींना फुटले पाय; डबल खरेदीला महापालिकेकडून प्रोत्साहन

दुसरीकडे बेशिस्तांना स्वशंयिस्त लावणाऱ्या यंत्रणांनीदेखील ‘चिरीमिरी’साठी काम न करता प्रामाणिकपणे जबाबादारी पार पाडण्याची गरज व्यक्त होत आहे. जानेवारी ते जून २०२२ मध्ये शहरात २९ अपघात आणि त्यात ३७ जणांचा मृत्यू झाला होता.

पण, यंदा सहा महिन्यात ४० अपघातात ४३ जणांचा बळी गेला आहे. दुसरीकडे ग्रामीण हद्दीत जानेवारी ते जून २०२२ मध्ये २९८ अपघातात ३३७ जणांचा मृत्यू झाला होता.

Solapur Accident News
Solapur Crime : काळया बाजारात विक्रीसाठी निघालेला गॅस कामती पोलीसांनी पकडला",मोठा अनर्थ टळला

रस्ता सुरक्षा समित्यांच्या बैठका आणि विविध यंत्रणांच्या कारवाईनंतरही यंदा २८ अपघात आणि ११ मृत्यू वाढल्याची वस्तुस्थिती आहे.

जिल्ह्यातील एकूण अपघातात तब्बल ४३२ जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. मग, दंडात्मक कारवाई करणारी यंत्रणा नेमकी करते काय, असा प्रश्न या आकडेवारीवरून उपस्थित केला जात आहे.

३९ अपघात अन्‌ १७ मृत्यू वाढले

खासदारांच्या अध्यक्षतेखाली रस्ता सुरक्षा समिती, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र रस्ता सुरक्षा समिती आणि त्यात प्रत्येक विभागातील वरिष्ठ अधिकारी असतात. समितीची दरमहा किंवा तीन महिन्यातून बैठक होऊन अपघात रोखण्यासाठी नेमके काय करायला हवे, यावर सविस्तर चर्चा होते.

Solapur Accident News
Solapur News : मसाल्याला बसला महागाईचा तडका; गृहिणींचे बजेट कोलमडले; बाजारपेठेवरही परिणाम

वाहन चालविण्याचा परवाना नसतानाही वाहन चालवणे, अनफिट वाहने रस्त्यावर, ट्रिपलसीट, विनाहेल्मेट, विनासिटबेल्ट वाहन चालवणे, शॉर्टकटसाठी अनेकजण विरुद्ध दिशेने वाहन चालवतात. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात ३७ अपघात आणि १७ मृत्यू सहा महिन्यांतच वाढले आहेत.

Solapur Accident News
Solapur : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा पर्यावरण भुषण पुरस्कार प्रविण तळेंना जाहीर

सहा महिन्यांतील अपघात व मृत्यू

  • शहर हद्दीतील अपघात - ४०

  • एकूण मृत्यू - ४३

  • ग्रामीणमधील अपघात - ३२६

  • एकूण मृत्यू - ३४८

Solapur Accident News
Solapur Crime : काळया बाजारात विक्रीसाठी निघालेला गॅस कामती पोलीसांनी पकडला",मोठा अनर्थ टळला

कारवाई प्रबोधनासाठी नव्हे, दंड वसुलीसाठीच.

राज्यातील सर्वाधिक अपघात होणाऱ्या जिल्ह्यात सोलापूर नेहमीच टॉप-५ मध्ये आहे. परंतु, संबंधित यंत्रणेला त्याचे गांभीर्य नाही. टोल नाक्यांवर महामार्ग पोलिस, तालुका, शहराच्या ठिकाण वाहतूक शाखेचे स्थानिक पोलिस आणि महामार्गांवर इंटरसेप्टर वाहन उभे असते.

मात्र, त्याठिकाणी बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लागावी, त्यांचे प्रबोधन व्हावे म्हणून कारवाई होत नाही तर दंडाची वसुली हाच त्यांचा हेतू असल्याची ओरड आहे. दंड केला की ती बेशिस्त वाहने तशीच सोडून दिली जातात, हे विशेष.

अपघात वाढण्याला नेमके जबाबदार कोण?

राज्यात रस्ते अपघात प्रचंड वाढले आहेत. सोलापूर जिल्ह्यातही अपघाती मृत्यू दिवसेंदिवस वाढत आहेत. वाढत्या रस्ते अपघाताला नेमकी कोणती कारणे प्रमुख वाटतात आणि त्यात काय सुधारणा हवी वाटते, त्यावर आपली प्रतिक्रिया ९७६६११३८५५ या व्हॉटसॲप क्रमांकावर नोंदवू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com