ई-पीक नोंदणी Canva
सोलापूर

सोलापूर : ई-पीक पाहणी कक्ष सुरू करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश

ई-पीक पाहणी माहितीचा कक्ष सुरू करावा, असे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज येथे दिले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : राज्य शासनाची ई पीक पाहणी ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेची माहिती सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्यासाठी योजनाचा प्रसार आणि प्रचार होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी लिलावाच्या ठिकाणी ई-पीक पाहणी माहितीचा कक्ष सुरू करावा, असे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज येथे दिले आहेत.

ई-पीक पाहणी कार्यक्रमांतर्गत जिल्हा संघटनांच्या प्रतिनिधीसोबत झालेल्या बैठकीत श्री. शंभरकर बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, उपजिल्हाधिकारी तथा ई-पीक पाहणीचे समन्वय नागेश पाटील, तलाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आर.जी. पांडेकर, पोलिस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप पाटील, कृषी सहाय्यक संघटनेचे जिल्हाध्यक्ष यु. एस. मोहिते आदी उपस्थित होते. श्री. शंभरकर म्हणाले, ई-पीक पाहणीचे काम सर्व संघटनांनी समन्वयाने करावे. ई-पीक पाहणी स्वत: करा, त्याची लोकांना माहिती द्या.

यामुळे या योजनेचा प्रचार व प्रसार वाढेल. यामुळे प्रत्येकाचे काम लवकर पूर्ण होईल. संघटना निहाय व्हॉट्‌स ॲप ग्रुप तयार करा. या ग्रुपवर कमी प्रतिसादाची गावे, तालुके यांची माहिती द्या. महा ई सेवा आणि कृषी सेवा केंद्रानी फ्लेक्‍स, पोस्टर, बॅनरव्दारे योजनेची प्रचार प्रसिध्दी करावी, असेही आवाहन त्यांनी केले. रब्बी हंगामात शेतकऱ्यांचा मेळावा घेवून ई-पीक पाहणीची माहिती आणि प्रात्यक्षिक दाखविण्याचे कृषी विभागाने सांगितले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी, कृषी सेवा केंद्र संघटनेचे प्रतिनिधी, महा ई-सेवा केंद्राचे प्रतिनिधी, चीटबॉय संघटनेचे प्रतिनिधी, रास्त धान्य दुकान संघटनेचे प्रतिनिधी, कोतवाल संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT