esakal | Solapur: कुर्मदास कारखाना उभारणार इथेनॉल प्रकल्प
sakal

बोलून बातमी शोधा

सोलापूर : कुर्मदास कारखाना उभारणार इथेनॉल प्रकल्प

सोलापूर : कुर्मदास कारखाना उभारणार इथेनॉल प्रकल्प

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

माढा (सोलापूर) : कुर्मदास कारखान्यास इथेनॉल प्रकल्प उभारण्यास वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर मिळाल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार ॲड. धनाजीराव साठे यांनी दिली. यावेळी ॲड. साठे म्हणाले, की सर्वांच्या सहकार्याने कारखाना प्रगती करत आहे. माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्यामुळेच कारखाना उभारला असून त्यास माजी कृषीमंत्री शरद पवार यांचे सहकार्य लाभले. कारखाना भविष्यात इथेनॉल, सहवीजनिर्मीती प्रकल्प केल्याशिवाय ऊस उत्पादकांना चांगला भाव देता येणार नाही.

म्हणून येत्या वर्षामध्ये ९० के.एल.पी.डी क्षमतेचा डिस्टलिरी प्रकल्पातून इथेनॉल प्रकल्प व १५ मेगावॅट क्षमतेचा सहवीजनिर्मीती प्रकल्प उभारणार आहे. त्यास सभासदांनी मंजुरी दिली आहे. संचालक दादासाहेब साठेंनी सभासदांचे स्वागत करत प्रास्ताविकांमध्ये कारखान्याने मागील हंगामामध्ये कोणत्याही बॅंकेचे कर्ज न घेता संचालकांच्या खाजगी मालमत्तेवर निधी उपलब्ध करुन हंगाम पार पाडला. इतर कारखान्याच्याबरोबरीने ऊसास दर दिला. मागील हंगाम २०२१-२०२२ मध्येही ऊस उत्पादक सभासदांनी चांगल्या प्रतिचा ऊस द्यावा जेणेकरुन कारखान्याच्या रिकव्हरीमध्ये वाढ होईल व शेतकऱ्यांना जास्त लाभ देता येईल. कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र देशमुख यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले.

हेही वाचा: घोषणा स्वबळाची; तयारी शुन्य

सभेला उपाध्यक्ष शिरीषकुमार पाटील, भालचंद्र पाटील, अरुण लटके, सुधीर पाटील, हरीदास खताळ, राहुल पाटील, सुरेखा पाटील, ॲड. बी. डी. पाटील, कार्यकारी संचालक राजेंद्र देशमुख, वैधानिक लेखापरीक्षक बी. यु. भोसले, सचिव चंद्रहास गायकवाड, प्रोडक्‍शन मॅनेजर बाळासाहेब पवार, शेती अधिकारी जमीर काझी, चिफ इंजिनिअर अंकुश कोळेकर, स्टोअर कीपर रामचंद्र हाजगुडे, परचेस ऑफिसर अविनाश बागल, टाईम किपर सिध्देश्वर बिनगे, सिव्हील सुपयवायझर अरुण मोरे, अक्रुर यादव, प्रताप पाटील, गजानन यादव उपस्थित होते. संचालक भालचंद्र पाटील यांनी आभार मानले. सूत्रसंचालन डी. व्ही. चवरे यांनी केले.

loading image
go to top