milk logo 
सोलापूर

सोलापूर दूध संघाची सुनावणी 27 फेब्रुवारीला 

प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाच्या आर्थिक कारभाराबाबत दुग्धचे पुणे विभागाचे विभागीय उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांनी दूध संघाला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटीसवर आज सुनावणी झाली असून पुढील सुनावणीसाठी 27 फेब्रुवारी ही तारीख देण्यात आली आहे. 
जिल्हा दूध संघाचे संचालक मंडळ बरखास्त करून संघावर प्रशासक नियुक्त का करू नये? याबाबत खुलासा करण्याची सूचना दूध संघास करण्यात आली आहे. या नोटीस वर आज विभागीय उपनिबंधक शिरापूरकर यांच्याकडे सुनावणी झाली. 
हेही वाचा - हालचाली सुरू... यंदाही होणार कृत्रिम पावसाचे प्रयोग 
म्हणणे मांडण्यासाठी दूध संघाने एक महिन्याची मुदतवाढ मिळावी अशी मागणी आजच्या सुनावणीत केली आहे. दूध संघाची ही मागणी फेटाळत दूध संघाला त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी दहा दिवसांची मुदत देण्यात आली आहे. 27 फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता या नोटीसवर आता सुनावणी होणार आहे. 
दूध संघाचे वकीलपत्र ऍड. उमेश मराठे यांनी स्वीकारले असून आजच्या सुनावणीसाठी ऍड. मराठे यांचे सहाय्यक ऍड. बाळकृष्ण वाकचौरे व जिल्हा दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालक सतीश मुळे उपस्थित होते. नोटीसमध्ये दिलेल्या मुद्द्यांचा अभ्यास करण्यासाठी व त्यावर आमचे म्हणणे सादर करण्यासाठी आम्हाला एक महिन्याची मुदत द्या अशी मागणी दूध संघाच्यावतीने करण्यात आली होती. एक महिन्याची मुदत देता येत नाही असे कारण सांगून विभागीय उपनिबंधक शिरापूरकर यांनी दूध संघ व संचालक मंडळाला दहा दिवसांची मुदत दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra farmer loan waiver : मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची केली घोषणा, काय आहेत नियम ? अहिल्यादेवी होळकरांचे दिले नाव

वाढवण बनेल ‘चौथी मुंबई’, १,२०० किमी मेट्रो, ६,००० किमीचा एक्सप्रेसवे अन्...; अर्थसंकल्पात मुंबईसाठी मोठा मास्टरप्लॅन, तरतुदी काय?

Maharashtra Budget 2026 : लाडक्या बहिणींचे २१०० रुपयांचे स्वप्न भंगले! वाढीव निधीच नाहीच, महायुती सरकारचा यू-टर्न; अर्थसंकल्पात मोठी निराशा

IND vs NZ Final Rule : ... तर भारत-न्यूझीलंड यांना संयुक्त जेतेपद दिले जाणार! T20 World Cup फायनलसाठी ICC चा नियम घ्या जाणून

Latest Marathi News Live Update :Mumbai live : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्यांची विधानसभेत महत्त्वाची घोषणा

SCROLL FOR NEXT