सोलापूर

गप्प जा... नाही तर डोक्यात दगड घालीन...

विजयकुमार सोनवणे

सोलापूर : शहरातील एका नामवंत डॉक्‍टरने मिळकत कराच्या थकबाकीपोटी दिलेला धनादेश तीन वेळा बाउन्स झाला. तरीसुद्धा महापालिका कर संकलन विभागातील अधिकाऱ्यांनी त्यांच्याविरुद्ध काहीच कारवाई केली नाही. दरम्यान, वसुली पथकातील कर्मचारी तेजस्विता कासार यांना विडी घरकुल परिसरात एका थकबाकीदाराने दमबाजी करून धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. 

कारवाई नसल्याने धनादेश बाउन्सचे प्रमाण वाढले
वसुली मोहीम सुरू झाल्यापासून आतापर्यंत जवळपास 10 ते 15 लाखांचे धनादेश बाउन्स झाले आहेत. संबंधितांविरुद्ध निगोशिएबल ऍक्‍टनुसार कारवाई करण्यात येईल, असे नियंत्रण अधिकारी तथा मुख्य लेखापाल शिरीष धनवे यांनी सांगितले होते. मात्र एकाहीविरोधात आतापर्यंत तशी कारवाई झाली नाही. आता एक डॉक्‍टरने तीन वेळेला दिलेला धनादेश बाउन्स झाला आहे. मात्र, संबंधिताविरुद्ध कारवाई करण्यात चालढकल केली जात आहे. 20 ते 25 हजारांची थकबाकी असलेल्यांचे नळजोड बंद करणारे महापालिका प्रशासन धनादेश बाउन्सप्रकरणी गप्प का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

महिला कर्मचारी असुरक्षित
महापालिकेची करवसुली मोहीम तीव्र करण्यात आली आहे. त्यासाठी खास वसुली पथक नियुक्त करण्यात आले आहे. या पथकामार्फत विडी घरकुल परिसरात वसुली सुरू होती. त्यावेळी थकबाकीपोटी एक गाळा सील करण्याची कार्यवाही सुरू असताना परिसरातील एक युवकाने येऊन सौ. कासार यांना दमबाजी केली, शिवाय "गप्प जा.. नाही तर डोक्‍यात दगड घालीन..' असे म्हणत अंगावर धावूनही गेला. या प्रकाराची माहिती कासार यांनी लगेच सदर बझार पोलिसांना दिली. संबंधित युवकाच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

नगरसेवकाचा हस्तक्षेप
गुन्हा दाखल होऊ नये यासाठी काही नगरसेवक प्रयत्नशील आहेत. तथापि या घटनेमुळे वसुली पथकातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. महापालिकेच्या अतिक्रमण खात्यासाठी विशेष पोलिस पथकाची नियुक्ती आहे. त्यांचा उपयोग वसुलीसाठी करता येणे शक्‍य आहे, तथापि तशा प्रकारची सुविधा करण्यासाठी वरिष्ठांकडून प्रयत्न होत नसल्याचे दिसून आले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

Ashadhi Wari 2025: वारकऱ्यांसोबत श्वानाची पंढरपूर वारी! महिनाभरात पालख्यांबरोबर चालत पोचतोय विठ्ठलचरणी

"उपाध्येंना अटेंशनची सवय.." निलेश साबळे-शरद उपाध्ये वादावर मराठी कलाकार व्यक्त ; म्हणाले...

PCMC News : आणखी तेरा ठिकाणी स्वस्त धान्य दुकाने; पुणे, पिंपरी-चिंचवड क्षेत्रांतील नागरिकांना ३१ जुलैपर्यंत करता येणार अर्ज

Hinjewadi News : हिंजवडी फेज २ ते लक्ष्मी चौक रस्ता होणार खुला; रस्त्यातील अतिक्रमणांवर ‘पीएमआरडीए’कडून कारवाई

SCROLL FOR NEXT