धक्का... 125 लखपती थकबाकीदार डिजिटलवर झळकणार 

धक्का... 125 लखपती थकबाकीदार डिजिटलवर झळकणार 

सोलापूर  :  मिळकत व पाण्याच्या कराची लाखो रुपये थकबाकी असलेल्या मिळकतदारांची नावे डिजिटल फलकावर प्रसिद्ध करून ती संबंधित प्रभागनिहाय लावण्यात येणार आहेत. या संदर्भातील प्रस्ताव तयार झाला असून, एक ते 67 लाख रुपयांपर्यंत थकबाकी असलेल्या तब्बल 124 मिळकतदारांची यादी महापालिकेने तयार केली आहे. ती प्रसिद्ध करण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. थकबाकीदारांमध्ये अनेक नामवंत व दिग्गजांचा समावेश आहे. वारंवार नोटिसा देऊनही कर भरण्यास प्रतिसाद मिळत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. 

तब्बल 316 कोटींची आहे थकबाकी 
महापालिकेच्या शहर व हद्दवाढ भागामधील मिळकतदारांकडे जवळपास 316 कोटींची थकबाकी आहे. ती वसूल करण्यासाठी प्रत्येक वर्षात नियोजन केले जाते. मार्च महिना आला की वसुलीचा जोर वाढतो. करवसुली तीव्र करण्यासाठी आयुक्तांनी सोमवारी बैठक घेऊन सक्त सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पेठांनुसार पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुटीच्या दिवशीही वसुली करण्याचा आदेश आयुक्तांनी दिला आहे. त्यामुळे उद्दिष्टपूर्तीसाठी कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू आहे. 

नगरसेवकांमार्फत येतो दबाव
शहराच्या काही ठराविक पेठा आणि झोपडपट्ट्यांच्या परिसरातील बहुतांश मिळकतदार थकबाकी भरण्यास सहसा तयार होत नाहीत. अनेकदा कर्मचाऱ्यांना रिकाम्या हाती परतावे लागते. गावठाण भागातील मिळकतदार पैसे भरण्यास तयार असतात, मात्र बहुतांश मिळकतदारांकडून नगरसेवकांमार्फत दबाव आणला जातो. त्यामुळे लाख रुपये थकबाकी असली, तरी पाच किंवा 10 हजार रुपयांवर कर्मचाऱ्यांना समाधान मानावे लागते. 

आयुक्तांनी घ्यावा पुढाकार 
शहराच्या सर्वच भागांतील मोठे थकबाकीदार कर्मचाऱ्यांना दाद देत नाहीत. त्यामुळे आयुक्तांनीच आता पुढाकार घेऊन अशा मिळकतदारांकडे जाऊन वसुली केली पाहिजे. प्रशासनप्रमुखच सोबत असल्याने कर्मचाऱ्यांना धैर्य येईल आणि कोणताही राजकीय व्यक्ती दबाव आणण्याचा प्रयत्न करणार नाही. तत्कालीन आयुक्त अजय सावरीकर आणि चंद्रकांत गुडेवार हे थकबाकी वसुलीसाठी स्वतः मैदानात उतरले होते. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत रोज सरासरी 90 ते 95 लाखांचा भरणा झाला. प्रभारी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या काळात तर कोट्यवधी रुपयांनी तिजोरी भरली. त्यांच्या काळात एकाही राजकीय व्यक्तीने हस्तक्षेप केला नाही की वसुली न करण्यासाठी दबाव आणला नाही. 

मिळकत कराचे टॉप थकबाकीदार
(स्रोत ः कर संकलन विभाग)
 
थकबाकीदार       रक्कम   रुपयांत 
डॉ. आंबेडकर खादी ग्रामोद्योग :  67,83,100 
कारीगर गर्ल्स हायस्कूल : 34,25,877 
सौ. जानी नवी पेठ : 30,40,281 
रामपुरे बंधू  : 16,00,930 
धो
त्रे बंधू  : 13,67,994 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com