Swine_Flu_ 
सोलापूर

'कोरोना'वर उपाय ! रुग्णांना स्वाईन फ्ल्यूची लस 

तात्या लांडगे

सोलापूर : 'कोरोना'ला हद्दपार करण्यासाठी आरोग्य विभागाकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. यापूर्वी एचआयव्हीवरील औषधांचा वापर करण्यात आला होता. आता या रुग्णांसाठी स्वाईन फ्ल्यूच्या लसीचा डोस दिला जात असून कोरोना विषाणू अन्‌ स्वाईन फ्ल्यू विषाणूत साम्य असल्याचे डॉक्‍टरांचे मत आहे. लस तयार करण्यासाठी दिड वर्षे लागणार असल्याने असे प्रयोग सुरु असल्याची माहिती सोलापुरातील सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी दिली. 


सोलापूरसह लातूर, उस्मानाबाद, कर्नाटकातून विविध प्रकारचे रुग्ण श्री छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात हजारो रुग्ण याठिकाणी दाखल होतात. सर्वोपचार रुग्णालयाने जिल्हा नियोजन समिती व आरोग्य विभागाकडे मागील दोन वर्षांपासून व्हेंटिलेटरची मागणी केली. तरीही ते मिळू शकले नसून आता कोरोना संशयीत रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालयातील अन्य रुग्णांसाठी वापरले जाणारे दोन व्हेंटिलेटर त्याठिकाणी उपलब्ध करण्यात आले आहेत. त्याठिकाणी सहा डॉक्‍टरांचे पथक तैनात असल्याचेही डॉ. ठाकूर यांनी सांगितले. दरम्यान, ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे, ज्यांना ब्लड प्रेशर, शुगर असे आजार आहेत, त्यांच्या मृत्यूची दाट शक्‍यता आहे. रोगप्रतिकारक क्षमता असलेल्यांनी घाबरू जाण्याचे काहीच कारण नसल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. तसेच कोरोना रुग्णांसाठी सर्वोपचार रुग्णालयात सहा बेडची स्वतंत्रपणे व्यवस्था केल्याचेही ते म्हणाले. डॉ. राजेश चौगुले यांची नोडल ऑफीसर म्हणून नियुक्‍त केल्याचेही त्यांनी सांगितले. 


उष्णतेमुळे सोलापुकरांना 'कोरोना'चा धोका कमीच 
उष्ण वातावरणात कोरोना व्हायरस टिकत नाही. सोलापुरातील वातावरण उष्ण असून जास्त तापमानात या विषाणूचा प्रसार होत नाही. त्यामुळे सोलापुकरांना कोरोनाचा धोका कमी आहे. परंतु, नागरिकांनी खरबदारी म्हणून गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळायला हवे. सण- समारंभ या दिवसांत साजरे करु नयेत. आरोग्य विभागाच्या माध्यमातून डॉक्‍टरांच्या प्रयत्नातून मेपर्यंत राज्यातील कोरोना हद्दपार होईल, असा विश्‍वासही डॉ. संजीव ठाकूर यांनी व्यक्‍त केला. 


डरो मत हम है तय्यार 
2009 मध्ये स्वाईन फ्ल्यूनेही असेच थैमान घातले होते, तरीही डॉक्‍टरांनी त्यावर यशस्वीरित्या मात केली. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण दोन ते तीन टक्‍क्‍यांपर्यंतच असून ज्यांची रोगप्रतिकारक शक्‍ती खूप आहे, त्यांना काहीच धोका नाही. नागरिकांनी घाबरु नये, डॉक्‍टरांची टीम सिव्हिल रुग्णालयात तयार आहे. तत्पूर्वी, सर्वांनी काळजी घ्यावी. 
- डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs NZ, Test: जो रुट पुन्हा झाला कर्णधार! नाईटक्लब घटनेनंतर बेन स्टोक्ससह ऍटकिन्सनही इंग्लंड संघातून बाहेर

Umarga Crime : सावकारी जाचातून महिला फार्मसिस्टचा विनयभंग; जिवे मारण्याची धमकी, तिघांवर गुन्हा दाखल

Narendra Modi: १२ वर्षांच्या कार्यकाळानंतर पंतप्रधान मोदींचा भावनिक सूर! नेहरूंचा विक्रम मोडल्यानंतर पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाले?

काँग्रेसचा उमेदवार मॅनेज? कोट्यवधींच्या घोडेबाजाराचा आरोप, स्थानिक नेते संतप्त, दिवसभरात नेमकं काय घडलं?

DGP Sadanand Date : ड्रग्ज तस्करी, संघटित गुन्हेगारी मोडून काढू

SCROLL FOR NEXT