सोलापूर

सोलापूर शहर आजपासून अनलॉक!

वेणुगोपाळ गाडी

शहरातील लॉकडाउन उठविण्यासंदर्भात गुरूवारी (ता. 3) सायंकाळी शासनाने महापालिकेस स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून मान्यता दिली.

सोलापूर : कोविड (Covid) आपत्तीमुळे गत दीड महिन्यांपासून कडक लॉकडाउनला (Lockdown) सामोरे गेलेले सोलापूर शहर व्यापारी- लोकप्रतिनिधींच्या रेट्यामुळे शुक्रवारपासून (ता. 4) अनलॉक (Unlock) झाले आहे. याअंतर्गत कोविडविषयक निर्बंधांमध्ये अंशत: शिथिलता मिळणार असून सर्व दुकाने, बाजारपेठा सकाळी सात ते दुपारी दोन या वेळेत सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (the city of solapur has been unlocked since friday)

शहरातील लॉकडाउन उठविण्यासंदर्भात गुरूवारी (ता. 3) सायंकाळी शासनाने महापालिकेस स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून मान्यता दिली. यासंदर्भातील पत्र शासनाकडून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना स्थानिक आपत्ती व्यवस्थापनप्रमुख या नात्याने प्राप्त झाले. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून पुढील आवश्‍यक सोपस्कर झाल्यानंतर शासन निर्देशातील नियम-अटींना अधीन राहून महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी रात्री सव्वा अकरा वाजता शहर अनलॉक संदर्भातील आदेश काढले.

यानुसार शहरातील अत्यावश्‍यक सेवेतील दुकाने सकाळी सात ते दुपारी दोन या वेळेत आठवड्यातील सर्व दिवस सुरू ठेवण्यास तर, अत्यावश्‍यक सेवेत न मोडणारी दुकाने सोमवार ते शुक्रवार यादिवशी सकाळी सात ते दुपारी दोनपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. या दुकानांतील मालक व कामगारांना कोविड चाचणी वा लसीकरण बंधनकारक आहे. बॅंकांच्या कामकाजाची वेळ देखील सात ते दोनपर्यंत राहणार आहे. हॉटेल, बार, रेस्टॉरंट हे पार्सल सेवेसाठी सकाळी सात ते दुपारी दोनपर्यंत सुरू ठेवता येणार आहे. तर, दुपारी दोन ते रात्री आठपर्यंत त्यांना घरपोच सेवा देण्यास परवानगी राहणार आहे.

ई-कॉमर्सअंतर्गत अत्यावश्‍यक वस्तू व सेवा तसेच अत्यावश्‍यक व्यतिरिक्त वस्तूंची घरपोच सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. सर्व शासकीय कार्यालये 25 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू ठेवता येणार आहे. कृषी संबंधित दुकाने तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती सातही दिवस सकाळी सात ते दुपारी दोनपर्यंत सुरू राहतील. यंत्रमाग, गारमेंट, विडी हे उद्योग, मद्य विक्रीची तसेच रेशन दुकाने सकाळी सात ते दुपारी दोनपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. या उद्योगातील कामगारांना कोविड चाचणी वा लसीकरण सक्तीचे असणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन, भारतीय दंड संहिता व अन्य कायद्यातील कलमांनुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही या आदेशात देण्यात आला आहे.

ठळक बाबी

- बिगरअत्यावश्‍यक सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवारपर्यंत उघडणार

- विडी, यंत्रमाग, गारमेंट उद्योग दुपारी दोनपर्यंत सुरू राहणार

- मद्य विक्री, रेशन दुकानांनाही दोनपर्यंत मुभा

- बॅंकांच्या कामकाजाची वेळ सात ते दोनपर्यंत

- हॉटेलविषयक घरपोच पार्सल सेवा दोन ते आठपर्यंत

- अत्यावश्‍यक कारणाशिवाय दुपारी तीननंतर नागरिकांना बाहेर पडण्यास मनाई

(the city of solapur has been unlocked since friday)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT