esakal | शरद पवारांच्या हस्ते सोलापूर शहर राष्ट्रवादीचा सन्मान, अभिप्राय नोंदणी अभियानात सोलापूर राज्यात तिसरे 
sakal

बोलून बातमी शोधा

logo

अभिप्राय नोंदणी अभियानात सोलापूर शहर राष्ट्रवादीला राज्यात तिसरा पुरस्कार मिळाला आहे. त्याच बरोबर फ्रंटल सेलचे 5 पुरस्कार घेऊन राज्यात सर्वात सर्वाधिक पुरस्कार सोलापूर शहर राष्ट्रवादीने मिळविले आहेत. माझ्या पक्षातील सर्व सहकारी, पदाधिकाऱ्यांनी ेघेतलेल्या कष्टाचा हा सन्मान आहे. सोलापूर शहरातील माझ्या सर्व सहकाऱ्यांच्यावतीने आज आम्ही हा सन्मान स्वीकारला. सन्मान स्विकारताना खूप आनंद झाला. पक्षातील ज्या सहकाऱ्यांनी पक्ष संघटनेसाठी वेळ दिला. मेहनत घेतली. पूर्ण निष्ठा आणि प्रामाणिकपणे काम केले. त्यांचे हे यश आहे. 
- संतोष पवार, कार्याध्यक्ष, सोलापूर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस 

शरद पवारांच्या हस्ते सोलापूर शहर राष्ट्रवादीचा सन्मान, अभिप्राय नोंदणी अभियानात सोलापूर राज्यात तिसरे 

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या कार्यक्रमात सोलापूर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा सन्मान करण्यात आला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते शहराध्यक्ष भारत जाधव व कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी हा सन्मान स्विकारला. 

यावेळी विधान परिषद सभापतीरामराजे नाईक निंबाळकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री जयंत पाटील, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, खासदार सुप्रिया सुळे, खासदार प्रफुल्ल पटेल, मंत्री नवाब मलिक, खासदार सुनील तटकरे, महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान यांची प्रमुख उपस्थिती होती. आजच्या कार्यक्रमात सोलापूर शहर राष्ट्रवादीला एकूण सहा पुरस्कार मिळाले आहेत. 

प्रदेश राष्ट्रवादीच्यावतीने घेण्यात आलेल्या अभिप्राय नोंदणी अभिनव उपक्रमात राज्यातील शहर व जिल्ह्याचे 72 युनीट सहभाग झाले होते. या 72 युनिटपैकी सर्वोत्कृष्ठ युनिटचा तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार सोलापूर शहर राष्ट्रवादीला मिळाला आहे. या शिवाय राज्यातील राष्ट्रवादीच्या इतर फ्रंटल संघटना आणि सेलच्या अभिप्राय नोंदणीमधून सोलापूर शहर व जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सेवादलला राज्यातील प्रथम, सोशल मीडिया सेलला राज्यातील द्वितीय, वकील सेलला प्रथम, कामगार सेलला प्रथम आणि व्हिजेएनटी सेलला देखील राज्यातील राज्यातील प्रथम पुरस्कार मिळाला आहे. 

सेवादल शहर अध्यक्ष चंद्रकांत पवार, जिल्हाध्यक्ष विलास चेळेकर, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष मिलिंद गोरे, शहर अध्यक्ष प्रमोद भोसले, कार्याध्यक्ष युवराज माने, वकील सेल जिल्हाध्यक्ष ऍड. बाबासाहेब जाधव, कामगार सेलचे शहराध्यक्ष गोवर्धन संचू, व्हिजेएनटी सेलचे रुपेश भोसले, जिल्हाध्यक्ष मोतीराम चव्हाण यांनी हे पुरस्कार पक्षाध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते स्वीकारले. 

सोलापुरात थेट प्रेक्षेपण 
मुंबईत झालेल्या या कार्यक्रमाचे थेट प्रेक्षेपण सोलापुरातील हुतात्मा सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमास करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बरडे, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, महापालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते किसन जाधव, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष जुबेर बागवान, माजी सभापती पद्माकर काळे, माजी सभापती राजन जाधव, नगरसेवक अमोल शिंदे, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या शहराध्यक्षा नगरसेविका सुनिता रोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमास महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आवर्जून हजेरी लावली होती.

loading image