गणेश मूर्तिकार Canva
सोलापूर

70 टक्के पीओपी, 30 टक्के इको-फ्रेंडली! गणेश मूर्तिकारांची अनुकूलता

70 टक्के पीओपी, 30 टक्के इको-फ्रेंडली ! गणेश मूर्तिकारांची अनुकूलता

वेणुगोपाळ गाडी

यंदा 70 टक्के पीओपी तर 30 टक्‍के शाडूच्या (पर्यावरणपूरक) मूर्ती विकणार, अशी ग्वाही शहर मूर्तिकार असोसिएशनकडून देण्यात आली.

सोलापूर : गणेशोत्सवाबाबत (Ganeshotsav) राज्य शासनाच्या गृह विभागाने काढलेल्या परिपत्रकाची सोलापूर शहरात (Solapur City) अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने मंगळवारी शहरातील गणेश मूर्तिकारांची बैठक घेतली. या वेळी शासन निर्देशांचे पालन व पर्यावरणपूरक पद्धतीने हा उत्सव साजरा करण्यासंदर्भात प्रशासनाने केलेल्या आवाहनाला मूर्तिकारांनी प्रतिसाद दिला. यंदा 70 टक्के पीओपी तर 30 टक्‍के शाडूच्या (पर्यावरणपूरक) (Eco-Friendly) मूर्ती विकणार, अशी ग्वाही शहर मूर्तिकार असोसिएशनकडून देण्यात आली.

गेल्या वर्षी गणेश उत्सवावर कोरोनाचे विघ्न होते. त्यामुळे मूर्तिकारांचे मोठे नुकसान झाले होते. या वर्षीही तिसऱ्या लाटेची शक्‍यता गृहीत धरून उत्सव निर्विघ्न पार पडावा व नुकसान टाळावे, अशी आशा गणेश मूर्तिकारांमध्ये आहे. गणेश मूर्तिकारांसोबत उत्सवाबाबत उपायुक्त धनराज पांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला नगर अभियंता संदीप कारंजे, महापालिकेचे पर्यावरण व्यवस्थापक स्वप्नील सोलनकर यांची प्रमुख उपस्थिती होती. शासन निर्देशानुसार घरगुती "श्रीं'ची मूर्ती दोन तर सार्वजनिक मूर्ती चार फुटांपेक्षा अधिक असू नये, आदी सूचना या वेळी पांडे यांनी केल्या. या वेळी मूर्तिकारांनी गतवर्षी कोरोना आपत्तीमुळे सार्वजनिक गणेश उत्सवावर बंदी असल्याने पीओपीच्या मूर्ती मोठ्या प्रमाणात पडून आहेत. यंदा त्या मूर्ती विकण्यासाठी परवानगी द्यावी, तसेच यंदा शहरात अनेक ठिकाणी स्टॉल्स उभारण्याची सोय करावी, अशी विनंती केली. यावर पांडे यांनी कोरोनासंदर्भात नियमांच्या अधीन राहून प्रशासन योग्य निर्णय घेणार, असे सांगितले.

बैठकीला असोसिएशनचे अध्यक्ष अमरनाथ कनकी, सचिव चंद्रकांत वग्गा, विजय यादव, संतोष गालपल्ली, लक्ष्मण खंडागळे, उमेश सूर्यवंशी, रगेश रायचूरकर, मधुकर कोक्कूल, प्रशांत चलवादी, राजकुमार व्हनकोरे, रूपेश म्याडम, अशोक हिबारे, पांडुरंग कुंभार, अनिल इंगळे, संतोष यमगर, गजेंद्र बांदीवडेकर, राजू गुंडला आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : अमित शहांचा आज पुणे दौरा, वाहतुकीत बदल

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT