श्रावण विशेष : सिद्धरामेश्‍वरांचे आराध्यदैवत श्री मल्लिकार्जुन

श्रावण विशेष : सिद्धरामेश्‍वरांचे आराध्य दैवत श्री मल्लिकार्जुन
श्रावण विशेष : सिद्धरामेश्‍वरांचे आराध्य दैवत श्री मल्लिकार्जुन
श्रावण विशेष : सिद्धरामेश्‍वरांचे आराध्य दैवत श्री मल्लिकार्जुनCanva
Summary

श्री सिद्धरामेश्‍वर स्वत: ज्या देवतेचे पूजन करत, उपासना करत ते आराध्य दैवत म्हणजे कपिलसिद्ध मल्लिकार्जुन होय.

सोलापूर : श्रावणात विशेष महत्त्व असलेले सोलापूर शहरातील (Solapur City) आणखी एक मंदिर म्हणजे श्री मल्लिकार्जुन मंदिर (Shri Mallikarjun Temple). श्री सिद्धरामेश्‍वर (Shri Siddheshwar) स्वत: ज्या देवतेचे पूजन करत, उपासना करत ते आराध्य दैवत म्हणजे कपिलसिद्ध मल्लिकार्जुन होय. हे मूळ मंदिर भुईकोट किल्ल्यात होते. त्या मंदिराचा चौथरा व अवशेष आजही किल्ल्यात आहेत. हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात गेल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने मंदिरात भाविकांना जाणे सोयीचे नसल्याने तत्कालीन समाजधुरिणींनी बाळीवेस येथे हे भव्यदिव्य मंदिर बांधले. मूळ मंदिरातील शिवलिंगासह (Shivling) ते स्थलांतरित करण्यात आले.

बेसाल्ट खडकातील पाषाणावर कोरण्यात आलेले सुबक नक्षीकाम व उत्कृष्ट बांधकाम शैली या मंदिराला लाभली आहे. मंदिराचे महाद्वार भक्कम दगडी उंच गोपुरांनी सजलेले आहे. भक्कम व देखणे असे हे मंदिर आहे. मंदिराच्या आत कोरीव खांबांवरील सभागृह, गर्भगृह व अनेक उपदेवतांची मंदिरे आहेत. सिद्धरामेश्‍वरांनी स्थापन केलेल्या 68 लिंगांपैकी 65 वे लिंग हे श्री मल्लिार्जुन लिंग आहे. याबरोबरच श्री आयलेश्‍वर लिंग, श्री आनंदेश्‍वर लिंग व श्री उमाक्षेत्रेश्‍वर लिंग हे याच मंदिराच्या आवारात आहेत. 68 लिंगांपैकी सिद्धेश्‍वर मंदिरापाठोपाठ सर्वाधिक लिंग या मंदिरात आहेत.

कसे जाल?

  • सोलापूर मध्यवर्ती बस स्थानकापासून केवळ 900 मीटर अंतरावर पूर्वेस बाळीवेस या ठिकाणी हे मंदिर आहे.

जवळील प्रक्षणीय स्थळे

  • आजोबा गणपती, कसबा गणपती, हिप्परगा येथील तळ्यातला गणपती व हिप्परगा तलाव तसेच रूपाभवानी मंदिर

उपदेवता

मंदिराच्या आत 68 लिंगांपैकी चार लिंग आहेत. याशिवाय वीरभद्रेश्‍वर, गणपती, नागनाथ, नवग्रह व इतर देवी-देवता.

लगतची खरेदीसाठीची ठिकाणे

  • नवी पेठसह शहराची मुख्य बाजारपेठ व टिळक चौक व अनेक नामांकित दालने

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com