3Pune_UGC_boost_single_girl_.jpg 
सोलापूर

सकाळ ब्रेकिंग ! जुलैनंतर सुरु होणार आगामी शैक्षणिक वर्ष 

तात्या लांडगे

सोलापूर : लॉकडाउनमुळे परीक्षा 14 एप्रिलपर्यंत पुढे ढकलल्या. आता लॉकडाउन आठ दिवसांत संपेल या आशेवर विद्यापीठांनी 27 एप्रिलपासून परीक्षेला सुरवात करण्याचे नियोजन केले आहे. परीक्षेसाठी एक महिना तर नापास विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे पूनर्मूल्यांकन अन्‌ निकालासाठी 40 दिवस लागणार आहेत. त्यामुळे आर्थिक वर्षानंतर आता आगामी शैक्षणिक वर्षही महिनाभर लांबणीवर पडेल, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. 

सोलापूरसह राज्यभरातील सर्वच विद्यापीठांच्या 2019-20 मधील शैक्षणिक वर्षाच्या परीक्षा मार्चमध्ये सुरु करण्याचे नियोजन होते. दरम्यान, पहिला लॉकडाउन 31 मार्चपर्यंत जाहीर केल्याने 1 एप्रिलपासून परीक्षा घेण्याचे फेरनियोजन झाले. मात्र, लॉकडाउन पुन्हा 14 एप्रिलपर्यंत केले अन्‌ विद्यापीठांनी पुढील आदेश येईपर्यंत वेळापत्रक तयार करण्याचे काम सोडून दिले. आता लॉकडाउन वाढणार की आठ दिवसांनंतर संपणार याबाबत संभ्रम कायम आहे. दरम्यान, उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी परीक्षा होणारच असे स्पष्ट केल्यानंतर आता 27 एप्रिलपासून परीक्षा सुरु संपूर्ण प्रक्रिया 15 जूनपर्यंत संपविण्याचे नियोजन विद्यापीठांनी केले आहे. मात्र, मे महिन्यात परीक्षा सुरु झाल्यास दिड महिन्यांहून अधिक विलंबाने शैक्षणिक वर्ष लांबणीवर पडेल, अशीही शक्‍यता व्यक्‍त केली जात आहे. त्याची घोषणा उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत हे लॉकडाउननंतर करतील, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. 

शैक्षणिक वर्ष लांबणार : अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आव्हान 
कोरोनाच्या संकटामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा लांबणीवर पडल्या असून आता 14 एप्रिलनंतर लॉकडाउनची स्थिती पाहून परीक्षेचे नियोजन केले जाईल. मात्र, यंदाचे शैक्षणिक वर्ष निश्‍चितपणे लांबणीवर पडणार असून त्यादृष्टीने नियोजन करण्यात येईल. 
- डॉ. मृणालिनी फडणवीस, कुलगुरु, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ 

तासिका तत्त्वावरील शिक्षकांची कसोटी 
किमान पाच वर्षाचा अध्यापन व उत्तरपत्रिका मूल्यांकनाचा अनुभव असलेल्या तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांनाच उत्तरपत्रिका तपासणीचा अधिकार आहे. मात्र, प्राध्यापकांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्‍त असल्याने आणि लॉकडाउनमुळे परीक्षा लांबणीवर पडली आहे. त्यामुळे हे सर्व नियम बाजूला ठेवून आता निकाल वेळेत लावण्यासाठी तासिका तत्त्वावरील सर्वच प्राध्यापकांची मदत घेतली जाणार आहे. परीक्षा 30 दिवसांत अन्‌ निकाल 25 दिवसांत लावण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. आगामी शैक्षणिक वर्षाचा अभ्यासक्रम नियोजित वेळेत संपविण्यासाठी आतापासूनच नियोजन सुरु झाले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Rate Today: सोनं-चांदीच्या भावात मोठी घसरण! 11 सप्टेंबरला पुन्हा दर कोसळणार? जाणून घ्या ताजी अपडेट

‘त्याला माझी इनसिक्युरिटी वाटायची’; अनेक वर्षांनंतर नीना गुप्तांनी उघड केलं गुपित, म्हणाल्या...'माझ्यापेक्षा जास्त...'

ChatGPT's 80s Photo Trend: Instagram वर व्हायरल होतोय 'ChatGPT ’80s Photo Trend'; 'हा' सोपा प्रॉम्प्ट वापरून तयार करा तुमचा ८० च्या दशकातील रेट्रो लूक!

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

Share Market Today: इराणच्या अमेरिकेला धमकीने शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 500 अंकांनी खाली; कोणत्या शेअर्सला मोठा फटका?

SCROLL FOR NEXT