31sugar_factory_4.jpg
31sugar_factory_4.jpg

सकाळ ब्रेकिंग ! गोदामांत सडतेय 90 लाख टन साखर 

सोलापूर : अडचणीत सापडलेला साखर उद्योग 2014-15 पासून अडचणीतून बाहेर पडलेला नाही. सद्यस्थितीत राज्यात तब्बल 90 लाख टन साखर कारखान्यांच्या गोदामांमध्ये पडून असून देशाअंतर्गत विक्री आता कोरोनाच्या लॉकडाउनमुळे घटली असून 20 मार्चपासून निर्यातही बंद झाली आहे. निर्यातीसाठी निघालेली दोन लाख टन साखर कोरोनामुळे बंदरांमध्ये अडकून पडली असून शिल्लक साखरेमुळे कारखानदारांसमोर अडचणीचा डोंगर उभा राहिला आहे. 


महाराष्ट्रातील साखर इराण, इंडोनेशिया, चीन, सौदी अरेबिया, दुबईसह मध्य पूर्व आशिया देशांमध्ये निर्यात केली जाते. 2017-18 मध्ये राज्यातून 13 लाख टन तर 2018-19 मध्ये 16 लाख टन साखरेची निर्यात झाली होती. 2019-20 मध्ये 20 लाख टन साखर निर्यातीचे उद्दिष्टे केंद्र सरकारने दिले होते, परंतु आतापर्यंत त्यातील सात लाख टन साखर निर्यात झाली आहे. 1 ऑक्‍टोबरपर्यंत उद्दिष्टपूर्तीचे आव्हान असून देशाअंतर्गत साखर दरमहा सात लाख टनांपर्यंत विक्री होणे अपेक्षित असतानाही कोरोनामुळे विक्रीत घट झाली आहे. आता स्पटेंबर 2020 पर्यंत सुमारे 30 लाख टन साखर विक्रीचे उद्दिष्टे असल्याची माहिती उपपदार्थ विभागाचे सहसंचालक डॉ. संजयकुमार भोसले यांनी दिली. दरम्यान, मागील तीन वर्षांपासून राज्यातील साखरेचे उत्पादन खपापेक्षा अधिक होऊ लागले असून दरवर्षी 25 ते 35 लाख टन इतकी साखर शिल्लक राहत असल्याचेही ते म्हणाले. आता यंदा तब्बल 50 लाख टन साखर शिल्लक राहणार असून आगामी साखर हंगामात साखरेचे उत्पादनही वाढणार असल्याने कारखानदारांची मोठी पंचाईत होणार आहे. 

साखर विक्रीचे मोठे संकट 
राज्यात सद्यस्थितीत 90 लाख टन साखर शिल्लक असून लॉकडाउनंतर निर्यात बंद आहे. 2019-20 मध्ये 20 लाख टन साखर निर्यातीचे उद्दिष्टे होते, परंतु त्यापैकी 13 लाख टन साखर निर्यात झालेली नाही. निर्यात बंद आणि साखरेची मागणी घटल्याने कारखानदारांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे. 
- डॉ. संजयकुमार भोसले, सहसंचालक, उपपदार्थ, साखर आयुक्‍तालय 


साखर साठ्याची स्थिती 
शिल्लक साखर 
90.28 लाख टन 
निर्यात करावयाची साखर 
13 लाख टन 
सप्टेंबरपर्यंत देशाअंतर्गत विक्रीचे नियोजन 
30 लाख टन 
विक्रीनंतरही शिल्लक राहणारा साठा 
50 लाख टन 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com