Solapur News
Solapur News sakal
सोलापूर

सत्ता कोणाची? जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या १७ संचालकांसाठी ‘या’ ६० उमेदवारांचे ९२ अर्ज; आज छाननी; माघार घेण्यासाठी ६ ते २० मार्चपर्यंत मुदत

तात्या लांडगे

सोलापूर : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्था नं. एकची निवडणूक प्रक्रिया सुरू असून, सोमवारी (ता. ४) अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. १७ संचालकपदासाठी तब्बल ९२ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. आता आज (मंगळवारी) अर्जांची छाननी होऊन बुधवारी अंतिम यादी प्रसिद्ध होईल. त्यानंतर ६ ते २० मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.

पतसंस्थेच्या महिला प्रतिनिधीसाठी मृणालिनी शिंदे, श्वेताबंरी राऊत, सुनीता भुसारे, मयूरी जावळकोटी, आशा वाघमारे, सरस्वती व्हनसुरे, शशिकला म्हेत्रे तसेच इतर मागासवर्गीय प्रतिनिधीसाठी सचिन मायनाळ, विजयसिंह घेरडे, सूर्यकांत तोडकरी, संतोष गोरे, श्रीकांत मेहरकर, वैभव नेमाणे, दीनानाथ जमादार तर अनुसूचित जाती-जमातीसाठी चेतन वाघमारे, दीपक सोनवणे, सरस्वती व्हनसुरे, सुरेश अभिवंत, दिनेश बनसोडे, सतीश वाघमारे व सुंदरराव नागटिळक यांनी अर्ज केले आहेत.

विमुक्त जाती, भटक्या जाती व वि. मा. प्रतिनिधीसाठी किरण लालबोंद्रे, राजेंद्र मानवी, संतोष जाधव, धन्यकुमार राठोड, शिवाजी राठोड व दत्तात्रय लवटे यांचे अर्ज आहेत. दोन पॅनेलमध्येच पतसंस्थेसाठी लढत होईल, अशी सद्य:स्थिती आहे. ज्या उमेदवारांचे दोन-तीन अर्ज आहेत ते निश्चितपणे पतसंस्थेसाठी उमेदवार असणार आहेत. सत्ताधाऱ्यांना पराभूत करण्यासाठी विरोधातील पॅनेलने समीकरणांची जुळवाजुळव सुरू केली असून पतसंस्थेसाठी ९१६ मतदार आहेत.

सर्वसाधारण प्रतिनिधीसाठी ६० अर्ज

पतसंस्थेच्या सर्वसाधारण प्रतिनिधीतून ६० जणांनी अर्ज केले आहेत. त्यात सचिन मायनाळ, शत्रुघ्नसिंह माने, सुरेश कुंभार, शहाजहान तांबोळी, शिवानंद म्हमाणे, किरण लालबोंद्रे, विष्णू पाटील, सतीश देशमाने, विजयसिंह घेरडे, सूर्यकांत तोडकरी, राजेंद्र मानवी, विवेकानंद लिंगराज, चेतन वाघमारे, गजानन मारडकर, नितीन पाटील, अविनाश गोडसे, आनंद साठे, दीपक सोनवणे, धन्यकुमार राठोड, श्रीधर कलशेट्टी, संतोष गोरे, विशाल घोगरे, बसवेश्वर डमडमे, श्रीशैल देशमुख, चेतन भोसले, विकास शिंदे, प्रशांत चाबुकस्वार, सूर्यकांत मोहिते, विजय भूमकर, तजमूल मुतवल्ली, नवनाथ वास्ते, विजय शेलार, विरपक्षी जेऊरे, धन्यकुमार काळे, अनिल जगताप, विकास तांबडे, प्रवीण पवार, दिनेश बनसोडे, किरण शेळके, सचिन येडसे, बाबासाहेब पाटील, श्रीकांत मेहरकर, दयानंद परिचारक, शिवाजी राठोड, राजेंद्र वारगड, वैभव नेमाणे, सतीश उनवने पाटील, सतीश वाघमारे, दत्तात्रय लवटे व सुंदरराव नागटिळक यांचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

Bhagwan Pawar: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई! काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

Pune Traffic News: गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीत एक जूनपासून बदल, वाचा महत्वाची बातमी

Railway News: नागरिकांच्या प्रवासावर ब्लॉक नको; मेगा ब्लॉकवर मनसे आमदार राजू पाटील यांचे ट्विट

SCROLL FOR NEXT