coronavirus belgum hubali patient  
पश्चिम महाराष्ट्र

धक्कादायक... हुबळीत आढळला ‘कोरोना’चा संशयित...

सकाळवृत्तसेवा

बंगळूर - केरळमध्ये कोरोना व्हायरसच्या तीन रुग्णांची पुष्टी झाल्यानंतर कर्नाटकातील आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग सावध झाला आहे. त्यानुसार मंगळूर, कोडगू, म्हैसूर आणि चमराजनगर या चार सीमावर्ती जिल्ह्यांना हाय अलर्टवर ठेवले आहे. दरम्यान, हुबळी येथे एक संशयित रुग्ण आढळला असून त्याला किम्स रुग्णालयात दाखल करण्यात 
आले आहे.

तो नुकताच चीनहून परतलेला

हुबळीतील संदीप केळसंगड (वय ३९) याला कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याचे आढळून आले असून तो नुकताच चीनहून परतलेला आहे. त्याला ताप, खोकला आणि थकवा आला असून त्याच्या प्रवासाचा इतिहास पाहून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तज्ज्ञांच्या पथकाद्वारे त्यांचे परीक्षण केले जात आहे. त्याचे नमुने संकलित केले असून त्यांना चाचणीसाठी एनआयव्ही पुणे येथे पाठविण्यात आले असल्याचे किम्सचे संचालक रामलिंगप्पा अंतेरतानी यांनी सांगितले. 
दरम्यान, केरळमध्ये मंगळूर, कोडगू, चामराजनगर आणि म्हैसूर या सीमावर्ती जिल्ह्यात एन-सीओव्ही पाळत ठेवत आहेत. राज्यात असा संशयित रुग्ण आढळल्यास त्वरित राज्यशाखेला (एसएसयू) कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

चार खासगी रुग्णालयेही निश्‍चित केली

केरळमधील कासारगोड जिल्ह्यातील कांजानगडमध्ये कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या प्रकरणाची पुष्टी झाली आहे. कासारगोड कर्नाटकातील मंगळूरच्या सीमेवर आहे. दरम्यान, २० जानेवारीपासून बंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील तब्बल ७,९६५ प्रवाशांना ताप शोधण्यासाठी थर्मल स्कॅनरने तपासणी केली आहे. कर्नाटक सरकारने चार खासगी रुग्णालयेही निश्‍चित केली असून त्यात संशयास्पद प्रवाशांना ठेवले जात आहे. त्यांचे रक्त आणि थुंकीचे नमुने बंगळूर वैद्यकीय महाविद्यालय व संशोधन संस्था (बीएमसीआरआय) येथील प्रयोग शाळेत किंवा राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ चेस्ट डिसीजीस (आरजीआयसीडी) जवळील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या शाखेत पाठविण्यात येत आहेत.

५६ जणांचे चाचणीसाठी नमुने

कोरोना बाधित देशांमधून कर्नाटकात ६३ प्रवासी आले आहेत. त्यापैकी ५८ जण स्वतंत्रपणे देखरेखीखाली असून ४ प्रवासी देश सोडून गेले आहेत, तर एकटा रुग्णालयात दाखल आहे. दरम्यान, ५६ नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी ३९ जणांचा नकारात्मक अहवाल आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG : प्लेअर ऑफ दी मॅच पुरस्काराचा खरा मानकरी मी नाही... Sanju Samsonने विजयाचे श्रेय दिले दुसऱ्याला, मन जिंकणारे विधान; म्हणाला, तो नसता तर मी इथे उभा नसतो

ऐ बाई, बस खाली...! MS Dhoni ने जल्लोष करणाऱ्या साक्षीला का रोखले? IND vs ENG सामन्यातील सर्वात सुंदर क्षण Video Viral

T20 WC, IND vs ENG SF: टीम इंडिया फायनलमध्ये! २२ वर्षीय जेकब बेथलची कडवी झुंज अपयशी, ८ मार्चला जेतेपदासाठी न्यूझीलंडला भिडणार

Sukhoi Missing: मोठी बातमी! भारतीय वायुसेनेचं अत्यंत शक्तिशाली सुखोई फायटर जेट बेपत्ता; शोध मोहीम सुरु

Pune News : भाजप नगरसेवकांच्या निर्णयामुळे केंद्राच्या प्रकल्पाला अडथळा, ८ कोटींचा निधी परत जाण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT