देवीच्या मिरवणुकीत भाविकांवर पडला दगडांचा पाऊस...

Stoneware in angol belgum marathi news
Stoneware in angol belgum marathi news

बेळगाव - दोन गल्ल्यांच्या मिरवणुकीवेळी वादावादीनंतर दगडफेक व लाठीहल्ला झाल्याची घटना अनगोळ येथे घडली. यात एक पोलिस व चार तरुण जखमी झाले आहेत. मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मरगाई देवीची ओटी भरण्यासाठी मिरवणुकीने जात असताना हा प्रकार घडल्याचे घटनास्थळावरून समजले. घटनेनंतर काही काळ अनगोळमध्ये तणाव निर्माण झाला होता. तेथे रात्री कडक पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.

दोन्ही गल्लीतील भाविक समोरासमोर आले

टिळकवाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक विनायक बडिगेर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद होऊन नंतर त्याचे पर्यवसान हाणामारी व दगडफेकीत झाले. यात एक पोलिस कॉन्स्टेबल जखमी झाल्याची माहितीही त्यांनी दिली. अनगोळ येथे मरगाई मंदिराची  वास्तुशांती व कलशारोहण सुरू आहे. त्याचा मंगळवारी महाप्रसादाचा कार्यक्रम सायंकाळी आटोपला. त्यानंतर अनगोळ येथीलच दोन गल्लींमधील भाविक वाद्यांच्या गजरात देवीची ओटी भरण्यासाठी निघाले होते. त्यावेळी दोन्ही गल्लीतील भाविक समोरासमोर आले. दोन्ही गल्लीतील तरुण मिरवणुकीत भगवा ध्वज घेऊन तो फिरवत होते. 

अन् वादाला सुरवात झाली...

यावेळी अनावधानाने एका ध्वजाचे नुकसान झाले. त्यातून वादाला सुरुवात झाली. आधी शाब्दिक चकमक, नंतर धक्काबुक्कीही झाली. त्यानंतर दगडफेकीला सुरुवात झाली. टिळकवडी पोलिसांना याची माहिती मिळाल्यावर निरीक्षक बडीगेर सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी पोहोचले. स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी त्यांनी लाठीहल्ला केला. 
त्यामुळे तेथील जमाव पांगला. अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर तेथील स्थिती नियंत्रणात आली. दगडफेक व लाठीहल्ल्यात जखमी झालेल्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी अद्याप रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद झाला नसल्याची तसेच कोणाला अटक केली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पाहुणेमंडळींना पोलिसांच्या चौकशी

दोन गल्लींमधील मिरवणुकीच्या वादातून अनेक घरांना त्याचा फटका बसला. यात्रेचे वातावरण असतानाच अचानक दंगलीचे स्वरूप आल्याने सर्वांची पळापळ सुरू झाली. यावेळी दगडफेक झाल्याने परिसरातील काही घरांचे नुकसान झाले. मिरवणूक जेथे जात होती तेथेच दगडफेक अधिक झाली. त्यामुळे त्या भागातील घरांवर दगफेक झाली. त्यामुळे भेदरलेल्या नागरिकांनी आपआपली घरे बंद करून घेणे पसंद केले. दगडफेकीमुळे रस्त्यावर काही ठिकाणी दगडांचा खच दिसून आला. तर काही घरांचे नुकसानही झाले आहे. घरांसमोर पार्किंग केलेल्या वाहनांचेही नुकसान झाले असून लोक रात्री उशिरापर्यंत घराबाहेर पडलेले नव्हते. त्यामुळे या दगडफेकीतून झालेल्या नुकसानीची माहिती बुधवारी सकाळीच कळणार आहे. पोलिसांनी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर रस्ते ओस पडले होते. त्यामुळे बाहेर गेलेले लोक घराकडे परतताना व पाहुणेमंडळींना पोलिसांच्या चौकशीतून घर गाठावे लागले. रात्री पोलिस आयुक्त बी. एस. लोकेशकुमार यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थतीचा माहिती घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com