पश्चिम महाराष्ट्र

आषाढी वारी 'बस'नेच; शासनाकडून फेरविचार नाही, आदेश जारी

कोरोनाच्या सावटामुळे यंदाही पायी वारीस शासनाने बंदी घातली आहे.

अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : कोरोनाच्या सावटामुळे (covid-19) यंदाही पायी वारीस शासनाने बंदी (restriction from authotiry) घातली आहे. या निर्णयाचा फेरविचार करावा. मर्यादित संख्येने पायी वारी करण्यास परवानगी देण्याची मागणी काही संस्थानांकडून, महाराज व वारकरी प्रतिनिधींकडून करण्यात आली होती. परंतु शासनाने फेरविचार न करता मंत्रींमंडळाच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार आदेश जारी केला आहे.

कोरोनाचे सावट असले तरी शेकडो वर्षांची परंपरा अखंड रहावी, यासाठी संख्येचा आग्रह न धरता अल्पसंख्येत प्रतिकात्मक पायी पालखी सोहळा असावा, अशी मागणी काही संस्थानांकडून तसेच महाराज व वारकरी प्रतिनिधींकडून करण्यात आली होती. परंतु राज्य मंत्रीमंडळाच्या झालेल्या बैठकीत कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भिती लक्षात घेऊन पायी वारीस परवानगी नाकारण्यात आली होती. त्याऐवजी मानाचे 10 पालखी सोहळे प्रत्येकी दोन एसटी बस मधून पंढरपूर तालुक्यातील वाखरीत येतील आणि तेथून दीड किमी अंतर प्रातिनिधिक स्वरुपात पायी वारी करण्यास परवानगी देण्यात आली होती.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विषयी माहिती जाहीर केल्यानंतर विविध महाराज मंडळी आणि वारकरी प्रतिनिधीनी शासनाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करुन शासनाने याचा फेरविचार करुन प्रातिनिधिक स्वरुपातील पायी वारीस परवानगी देण्याची मागणी केली होती. परंतु शासन स्तरावर फेरविचार करण्याच्या मागणीची दखल घेण्यात आली नसून मंत्रीमंडळाच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे आषाढी वारी विषयी सविस्तर शासन आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशात पुढील गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत.

मानाच्या दहा पालखी सोहळ्यांचा आषाढी वारी प्रस्थान सोहळा

या वर्षी देहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी शंभर व उर्वरित आठ सोहळ्यासाठी प्रत्येकी पन्नास वारकऱ्यांना प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता येईल. यामुळे या पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या पालखी, दिंड्यांना प्रातिनिधीक स्वरुपात प्रस्थान सोहळ्याव्दारे आषाढी वारीमध्ये सहभागी होता येईल.

मानाच्या पालखी सोहळ्यांना पायी वारी करण्याबाबत

प्रस्थान ठिकाणापासून विशेष वाहनाव्दारे वाखरी येथे पोचल्यानंतर तेथून पंढरपूरकडे दीड किलोमीटर अंतर प्रातिनिधीक स्वरुपात पायी वारी करण्यास परवानगी देण्यात येत आहे.

मानाच्या पालखी सोहळ्यांचा पंढरपूर येथील मुक्काम कालावधी...

या वर्षी सर्व मानाच्या पालखी सोहळ्याचे पंढरपूर मध्ये दशमीच्या दिवशी आगमन होऊन पौर्णिमेच्या दिवशी प्रस्थान करण्यास मान्यता देण्यात आली आहे. शासकीय महापूजेस आणि श्री विठ्ठलास संतांच्या भेटी विषयी गतवर्षीप्रमाणे मान्यता देण्यात आली आहे.

श्रींच्या 24 तास दर्शनाबाबत...

- श्रींचे नित्योपचार परंपरेप्रमाणे सुरु ठेवून आषाढी यात्रा कालावधीमध्ये भाविकांसाठी दर्शन बंद ठेवण्यात येईल.

- श्री संत भानुदास महाराज पुण्यतिथी सोहळा दोन अधिक दोन असे एकूण चार व्यक्तींच्या उपस्थितीत साध्या पध्दतीने साजरा करावा.

- श्री विठ्ठलाच्या पादुकांची मिरवणूक पंधरा व्यक्तींसह साध्या पध्दतीने साजरा करावी.

- ह. भ. प. श्री गुरुदास महाराज देगलूरकर यांचे चक्री भजनासाठी देगलूरकर महाराज व अन्य चार व्यक्ती असे एकूण पाच व्यक्तींना वैद्यकीय तपासणीच्या अटींच्या अधिन राहून परवानगी देण्यात आली आहे.

- ह.भ.प. श्री अंमळनरेकर महाराज व ह.भ.प. कुकुरमुंडे महाराज यांना त्यांच्यासोबत प्रत्येकी दोन व्यक्तींना वैद्यकीय तपासणीच्या अटीच्या अधिन राहून परवानगी देण्यात आली आहे.

- महाव्दार काल्याचा सोहळा एक अधिक दहा व्यक्तींसह सामाजिक अंतर राखून व योग्य ती खबरदारी घेऊन साजरा करावा.

- श्री संत नामदेव महाराज समाधी सोहळा उत्सव एक अधिक दहा व्यक्तींसह सामाजिक अंतर राखून व योग्य ती खबरदारी घेऊन साजरा करावा.

- एकादशीच्या दिवशीचा रथोत्सव सोहळा रथा ऐवजी मंदिराच्या स्वतंत्र वाहनाने 10 मानकरी व मंदिर समितीचे 5 कर्मचारी असे 15 व्यक्तींसह साजरा करावा.

- संतांच्या पादुका भेटीचा कार्यक्रमासाठी या वर्षी प्रत्येक मानाच्या पालखी सोबत 40 वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे.

वारकरी संख्या..

या वर्षी दोन बस आणि प्रत्येकी बस मध्ये वीस या प्रमाणे 40 वारकरी संख्येस परवानगी देण्यात आली आहे.

गोपाळकाला...

जिल्हाधिकारी सोलापूर यांनी सादर केलेल्या अभिप्रायाप्रमाणे या वर्षी मानाच्या पालखी सोहळ्यांना एक अधिक दहा या प्रमाणात गोपाळपूर येथे भजन व किर्तनास परवानगी देण्यात आली आहे. संतांचे नैवेद्य व पादुकासाठी दशमी ते पौर्णिमा असे सहा दिवस दोन व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे.

संत एकनाथ महाराज काला (24-7-2011 पौर्णिमा) होईल. या वर्षी संत एकनाथ महाराज यांच्या दिंडीला ज्या प्रमाणात शासनाकडून प्राप्त होईल तितक्या व्यक्तींच्या उपस्थितीत संत एकनाथ महाराज काला करण्यास परवानगी देण्यात येत आहे. त्याबाबत नियोजन मंदिर समिती मार्फत करण्यात येईल.

प्रक्षाळपूजा 28-जुलै रोजी पौर्णिमा दिवशी होईल. जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या अहवालात नमूद केल्या प्रमाणे यावर्षी श्री विठ्ठलाची प्रक्षाळपूजा समिती सदस्य यांच्या हस्ते सपत्निक दोन अधिक तीन, श्री रुक्मिणीमातेची प्रक्षाळपूजा दोन अधिक तीन, श्री विठ्ठलाकडे 11 ब्रम्हवृंदांकडून श्रींस रुद्राचा अभिषेक व श्री रुक्मिणीमातेस 11 ब्रम्हवृंदांकडून पवमान अभिषेक करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

स्थानिक दिंडीकरी, फडकरी, महाराज मंडळींना श्रीं च्या दर्शनासाठी व्यवस्था करणे बाबत निर्णय झाला आहे. आषाढी एकादशी दिवशी ( मंगळवार 20-7-2021) रोजी स्थानिक महाराज मंडळींना (संख्या 195) श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेण्यास परवानगी तसेच त्यांना वेळ व प्रवेश पत्रिका देणे बाबत कार्यवाही कार्यकारी अधिकारी मंदिर समिती यांनी करायची आहे. कोविड 19 च्या प्रतिबंधासाठी केंद्र आणि राज्य शासनाने वेळोवेळी काढलेल्या आदेशांचे काटेकोर पालन होईल याची दक्षात घेण्या विषयी शासन आदेशात नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air Ambulance Crash: भीषण विमान दुर्घटना!,रांचीहून दिल्लीला निघालेली 'एअर अ‍ॅम्ब्यूलन्स' घनदाट जंगलात कोसळली

Team India Semi Final Scenario : टीम इंडियाला नेट रन रेट रडवणार! झिम्बाब्वेविरुद्ध ११ षटकं अन् विंडीजविरुद्ध १८३ धावांनी विजय... तिसरं समीकरणही लैय अवघड

Onion Rate Issue : कांदा उत्पादकांना एकरी ५० हजारांचा तोटा; शेतकऱ्यांत बाजारभावाअभावी चिंता, उत्पादन खर्च भागविण्याचाही प्रश्न

Bangladesh Politics : पंतप्रधान तारिक रहमान यांचा मोहम्मद युनूस यांना मोठा धक्का!

Yavatmal News : जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या एप्रिलमध्ये होणार; सीईओंचे गटविकास अधिकार्‍यांना पत्र

SCROLL FOR NEXT