t twenty-five thousand Photographer in trouble kolhapur marathi news 
पश्चिम महाराष्ट्र

पश्‍चिम महाराष्ट्रातील 25 हजार फोटोग्राफरांच्या क्लिक ला कोरोनाचा झटका....

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : महापुराचे संकट गेले आणि आता दुसरे जगभरात कोरोनाचे संकट थैमान घालत आहे. त्यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील सुमारे पंचवीस हजार छायाचित्रकारांवर उपासमारीचे संकट उभे ठाकले आहे. दरम्यान, लग्नसराईचे दिवस असून, लॉकडाऊनमुळे विवाह सोहळ्यांवर बंदी आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पश्‍चिम महाराष्ट्रातील चित्र 

लॉकडाऊननंतर विवाहांचे प्रमाण वाढणार असले तरी छायाचित्रकार मिळणे अवघड होणार असल्याचे चित्र आहे. 
कोरोनाच्या जागतिक संकटामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले आहेत. काही ठिकाणी अगदी साध्या पध्दतीने किंवा ऑनलाईन पध्दतीने सोहळ्यांवर भर दिला गेला आहे.

पंचवीस हजारांवर छायाचित्रकार अडचणीत 

त्यामुळे सर्वच छायाचित्रकारांना ऑर्डरना मुकावे लागत आहे. बदलत्या जगाबरोबर आपणही अपडेट राहावे म्हणून काही छायाचित्रकारांनी नवीन कॅमेरे आणि अत्याधुनिक मटेरियल बॅंक कर्जे घेऊन खरेदी केले आहेत. मात्र, ऑर्डरच नसल्याने बॅंकेचे हप्तेही थकले आहेत. लॉकडाऊननंतरही अपेक्षित व्यवसाय होईल, याची शाश्‍वती देता येत नाही, असे सध्याचे चित्र आहे. 

शासनाने एखादी योजना लागू करावी. 
छायाचित्रकारांचा व्यवसाय हा बारमाही नसतो. लग्नसराई व मोठ्या समारंभाच्या ऑर्डरवरच त्यांचा व्यवसाय अवलंबून असतो. त्यामुळे त्यावरच त्याचे वार्षिक आर्थिक नियोजन असते. मात्र, आता विवाह आणि मोठे कार्यक्रमही नाहीत. त्यामुळे छायाचित्रकारांवर उपासमारीची वेळ येणार आहे. राज्य शासनाने अधिकृत छायाचित्रकारांना बॅंकेची सवलत अथवा एखादी योजना लागू करावी. 
- संजीव देवरूखकर, अध्यक्ष, जिल्हा फोटोग्राफर्स असोसिएशन 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG, 1st ODI: भारताने उडवला अफगाणिस्तानचा धुव्वा; कर्णधार गिलची शानदार फिफ्टी, तर केएल राहुलची 'क्लास' फिनिश

Pune Fraud News : गुंतवणुकीच्या आमिषाने १२ कोटींची फसवणूक; पुण्यातील ४६ गुंतवणूकदारांची फसवणूक

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या पथकाची स्वारगेट बस स्टॉपवरील दुकानांवर धाड; ...तोपर्यंत दुकानं बंद ठेवण्याच्या सूचना

Gas Cylinder Shortage : खाद्यपदार्थांच्या दरात वाढ! दरवाढीमुळे हॉटेल व्यवसाय ‘गॅस’वर; बचतीसाठी शेगड्यांचा वापरही कमी

Modi-Trump Meeting: डोनाल्ड ट्रम्प-नरेंद्र मोदी यांची भेट ठरली; व्हाईट हाऊसची मंजुरी, 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा

SCROLL FOR NEXT