Relief for the poor: Vikhe Patil Hospital will bear all the cost of delivery 
पश्चिम महाराष्ट्र

गरिबांना दिलासा ः विखे पाटील हॉस्पिटल प्रसूतीचा सर्व खर्च उचलणार

सकाळ वृत्तसेवा

नगर ः जिल्ह्यातील कोरोना-संशयितांची तपासणी जिल्हा रुग्णालयात सुरू आहे. त्यामुळे गोरगरीब महिलांच्या प्रसूती व त्यांच्या नवजात बालकांवरील उपचार डॉ. विखे पाटील मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये मोफत होणार आहेत. यासाठीचा सर्व खर्च विखे पाटील कुटुंबीय उचलणार आहेत, अशी माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आज पत्रकाद्वारे दिली.

डॉ. विखे पाटील यांनी म्हटले आहे, की जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, नगरमधील जिल्हा रुग्णालय कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयामध्ये संपूर्ण जिल्ह्यातील, विशेषतः ग्रामीण भागातील रुग्ण येतात. अशा वेळी प्रसूतीसाठी येणाऱ्या माता-भगिनींचे हाल होऊ नयेत व त्यांना दर्जेदार सेवा मिळावी, या हेतूने विळद घाट येथील डॉ. विखे पाटील मेमोरिअल हॉस्पिटलने पुढाकार घेतला आहे.

जोपर्यंत नगर जिल्हा रुग्णालय "कोविड हॉस्पिटल' म्हणून जाहीर करण्यात आलेले आहे, तोपर्यंत नगर जिल्ह्यातील सर्व प्रसूती डॉ. विखे पाटील मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये होतील. यासाठीचा सर्व खर्च विखे पाटील परिवारातर्फे उचलण्यात येईल. यादरम्यानच्या काळात रुग्णालयात येणाऱ्या कुठल्याही माता-भगिनींना अडचण निर्माण होणार नाही आणि त्यांना अधिक चांगल्या व दर्जेदार सेवा हॉस्पिटलतर्फे देण्यात येतील.

यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी चर्चा झाली आहे. प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल डॉ. विखे यांनी आभार व्यक्त केले. डॉ. विखे पाटील मेमोरिअल हॉस्पिटलने यापूर्वीदेखील खासदार डॉ. विखे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 60 ते 70 आरोग्य शिबिरांच्या आयोजनातून जवळपास एक लाख रुग्णांवर मोफत उपचार केले आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: पेपर लीकविरोधात 'कॉकरोच जनता पार्टी'चा एल्गार! आंदोलनासाठी परवानगी कशी मिळते? जाणून घ्या प्रक्रिया

Diesel Selling : कॅनमध्ये डिझेल विक्रीला बंदी; व्यावसायिकांसह वाहनचालकांची गैरसोय

Bhor News : माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे निधन

Hero HF Deluxe : पेट्रोलची चिंता संपणार? नितीन गडकरींची मोठी भेट; भारतात पहिल्या Flex Fuel बाईकची एन्ट्री, किंमत 72 हजारपासून सुरू

Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघात! एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT