भाजपा आमदार जयकुमार गाेरेंना वाटू लागली 'या' गाेष्टीची भिती

भाजपा आमदार जयकुमार गाेरेंना वाटू लागली 'या' गाेष्टीची भिती
Updated on

बिजवडी (जि.सातारा)  : कोरोनाबाधित इतर देशांत लॉकडाउन कडक करण्यात येत असताना देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण असणाऱ्या महाराष्ट्रात लॉकडाउन शिथिल करणे धोक्‍याचे आहे. कोरोनाचे सायलेंट कॅरिअर धोकादायक ठरू शकते, असे मत आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले.
 
लॉकडाउन असल्याने अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. उद्योगधंदे बंद आहेत. मोलमजुरी करणाऱ्यांची उपासमार होत आहे. अनेक अडचणी येत आहेत. त्यासाठी लॉकडाउन शिथिल करून काही अस्थापना सुरू करायचा निर्णय घेतला जात आहे. खरे तर लॉकडाउनमुळे येणाऱ्या अडचणी, अर्थव्यवस्थेवर येणारा ताण अशा गोष्टींमध्ये काही कालावधीमध्ये सुधारणा करता येईल. मात्र, शिथिलता येण्याने कोरोनाची साथ वाढलीच तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. ते संकट निस्तरणे अवघड होईल. लॉकडाउनमधील शिथिलतेचा लोक वेगळा अर्थ काढून गर्दी करतील. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडेल. वैद्यकीय माहितीच्या आधारे सांगण्यात आल्यानुसार कोरोनाचे सायलेंट कॅरिअर या काळात धोकादायक ठरेल. जीवनावश्‍यक वस्तूंच्या वाहतुकीच्या नावाखाली लोकांचे दुसऱ्या ठिकाणी जाण्याचे प्रमाण वाढेल. इतके दिवस कोरोनाला थोपवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांवर पाणी फिरेल. सुरक्षित असणारा ग्रामीण भाग कोरोनाच्या सावटाखाली येण्याची शक्‍यता वाढेल. म्हणूनच शासनाने घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करावा. किमान तीन मेपर्यंत लॉकडाउनची कडक अंमलबजावणी करावी. 

जरी अर्थव्यवस्था, जीवनावश्‍यक वस्तू आणि इतर कारणांमुळे लॉकडाउन शिथिल झाले तरी लोकांना स्वतःची काळजी घ्यावी लागणार आहे. सार्वजनिक ठिकाणी जाणे कटाक्षाने टाळावे लागणार आहे. आणखी बराच कालावधी सोशल डिस्टन्सिंगचा वापर करावा लागणार आहे. घरीच थांबून कोरोनाला रोखावे लागणार आहे. घरोघरी स्वच्छतेचा जागर सुरूच ठेवावा लागणार आहे. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्रत्येकाला प्रयत्न करावे लागणार आहेत.

जरुर वाचा : मटण, चिकन, मासे विक्रेत्यांना दिलासा

मोफत तांदळाचा भात शिजतोय कुठं ?

दारुबिरु सब कुछ झूठ रे बाबा; टेक केअर

Video : जाणून घ्या स्मशानभूमीतील भाताच्या गोळ्यांचे रहस्य

Lockdown : एका फाेनवर मिळवा तुमचा बॅंक बॅलन्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

MD Drugs Replace Gang Rivalries: Organized Crime Network Tightens Grip in Western Maharashtra
Anjali Vetal from Karad wins bronze medal at U-15 Asian Wrestling Championship in Thailand
Wildlife rescuer trapped by rat snake
Why are Sangli farmers opposing the Shaktipeeth Highway?
Marathi News Esakal
www.esakal.com